Education News: दहावी आणि बारावीच्या परीक्षा हाेणार वेळेवरच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 08:27 AM2022-01-31T08:27:07+5:302022-01-31T08:27:38+5:30
SSC and HSC exams कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भविष्यात होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासपूर्वक परीक्षांचा कार्यक्रम निश्चित केला आहे.
मुंबई : कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भविष्यात होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासपूर्वक परीक्षांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेतच दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचा खुलासा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी केला.
दहावी, बारावीच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलण्याच्या मागणीवर शिक्षण खाते विचार करत असल्याचे विधान शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी केले होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांची दिशाभूल होता कामा नये, असे आवाहनही गायकवाड यांनी केले. काही बदल झाल्यास त्याची माहिती दिली जाईल. सध्या तरी परीक्षांच्या तारखा बदलण्याबाबत कोणताही विचार अथवा निर्णय झाला नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.