आरटीई प्रवेशासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; ओटीपी समस्या, लॉकडाऊनमुळे निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 02:29 AM2021-03-21T02:29:53+5:302021-03-21T07:04:06+5:30

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुले किंवा मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे

Extension till March 31 for RTE admission; OTP problem, decision due to lockdown | आरटीई प्रवेशासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; ओटीपी समस्या, लॉकडाऊनमुळे निर्णय 

आरटीई प्रवेशासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; ओटीपी समस्या, लॉकडाऊनमुळे निर्णय 

Next

मुंबई : वाढत्या कोरोनामुळे विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात येत असलेले लॉकडाऊन आणि आरटीई प्रवेश प्रक्रियेत ओटीपीच्या निर्माण झालेल्या तांत्रिक समस्येमुळे आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी पालकांना ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे २०२१-२२ या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुले किंवा मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. २०२०-२१  या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी सर्व जिल्ह्यांतील आरटीईअंतर्गत पात्र असलेल्या ९४३२ शाळांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्यास ३ मार्चपासून सुरुवात झाली. पालकांना २१ मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत दिली होती; परंतु मात्र ११ ते १५ मार्चदरम्यान ओटीपीची तांत्रिक अडचण आल्यामुळे पालकांना अर्ज भरता आले नाहीत. आता तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असली तरी अनेक पालकांना अर्ज करण्यसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी त्यांनी संचालनालयाकडे केली होती. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन घोषित झाल्याने मुदतवाढ देण्यात आली.

मुंबई जिल्ह्यात गेल्या वर्षी ३६७ शाळांनी नोंदणी केली होती. त्यातून ७ हजार २ जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या होत्या. यंदा मात्र शाळांच्या नोंदणीत घट झाली असून केवळ ३५२ शाळांची नोंदणी झाली. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी केवळ ६४६३ जागा उपलब्ध होऊ शकतील. 

आरटीई २०२१-२२
शाळांची संख्या - पहिलीसाठी जागा - पूर्वप्राथमिक जागा  
राज्य मंडळ - २९०-४८०९-४१८
इतर बोर्ड - ६२-११७२-६४
एकूण - ३५२-५९८१-४८२

Web Title: Extension till March 31 for RTE admission; OTP problem, decision due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.