पदवीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतही घसरण, तिसऱ्या यादीसाठी धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 06:49 AM2022-07-08T06:49:16+5:302022-07-08T06:49:42+5:30

सेल्फ फायनान्सकडील कलामुळे गुणवत्ता यादीत चढ-उतार 

Falling to second degree list of degrees, waiting for third list | पदवीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतही घसरण, तिसऱ्या यादीसाठी धाकधूक

पदवीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतही घसरण, तिसऱ्या यादीसाठी धाकधूक

Next

मुंबई : पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी शहरातील महाविद्यालयांनी जाहीर केली. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये काही ठिकाणी २ ते ३ टक्क्यांची, तर काही ठिकाणी ५ ते ७ टक्क्यांची घसरण दिसून आली. सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाचे निकाल या आठवड्यात जाहीर झाले, तर पुढच्या आठवड्यात जाहीर होणाऱ्या गुणवत्ता यादीवर त्याचे प्रमाण निश्चित होणार असून ‘कट ऑफ’ पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आता तिसऱ्या गुणवत्ता यादीतील नावासाठी प्रतीक्षा करावी की नाही, या संभ्रमात विद्यार्थीं असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

‘कट ऑफ’ तिसऱ्या किंवा चौथ्या गुणवत्ता यादीतही वाढण्याची शक्यता आहे. पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ‘कट ऑफ’ घसरला असला तरी स्वयं अर्थसहाय्यित अभ्यासक्रमाचे ‘कट ऑफ’ मात्र काही महाविद्यालयांत अद्यापही नव्वद टक्क्यांच्या वर असलेले दिसून आले. विशेष म्हणजे, काही महाविद्यालयांत तर दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये कॉम्प्युटर सायन्स, आयटी सारख्या अभ्यासक्रमाचे ‘कट ऑफ’ वाढलेले दिसून आले आहेत. रुपारेल महाविद्यालयात पाहिल्या गुणवत्ता यादीनंतर दुसऱ्या गुणवत्ता यादीत बीएमएस (विज्ञान ) शाखेचा, साठ्ये महाविद्यालयात बीएस्सी आयटीसाठी ‘कट ऑफ’ वाढलेला दिसून आला आहे. 

सीबीएसई, आयसीएसईसाठी किती जागा ?
साठ्ये महाविद्यालयातील बीएमएस (कला ) शाखेच्या जागा दुसऱ्या यादीसाठी उपलब्ध नसल्याचे जाहीर झाले. अनेक महाविद्यालयांच्या जागा या दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर भरल्या जातात. काही स्वायत्त महाविद्यालयांनी विविध शाखांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव आहेत. मात्र, त्यामुळे सीबीएसई व  आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी किमान जागा तरी उपलब्ध असतील का, हा प्रश्न आहे.

साठ्ये महाविद्यालय 
एफवाय बीए     ३८. १६ % 
एफवाय बीएस्सी     ४०. ८३ % 
एफवाय बीकॉम     ४२. ८% 
बीएस्सी आयटी     ६७% 
बीएमएस (आर्टस्)- जागा नाहीत 
बीएमएस (कॉमर्स )    ७८. ३३ % 
बीएमएस (सायन्स )    ४९. १६ % 
रुईया महाविद्यालय 
एफवाय बीएस्सी (सीएस)    ८२.५% 
एफवायबीएस्सी     ५०% 
एफवय बीए - (इंग्रजी )    ८७. ५% 
एफवाय बीए (मराठी )    ४०. १७%

रुपारेल महाविद्यालय 
एफवाय बीए     ८३. ६६ % 
एफवायबीकॉम     ७२. ५०% 
एवायबीएससी (आयटी )    ६४ 
एफवायबीससी (सीएस)    ७०. ८३% 
बीएमएस (आर्टस्)    ६४%
बीएमएस (कॉमर्स )    ८१. ३३% 
बीएमएस (सायन्स )    ६०. ६६ % 
विल्सन महाविद्यालय 
एफवायबीकॉम     ८१% 
एवायबीएस्सी (आयटी )    ८३. ५% 
बीएमएस (आर्टस्)    ७३. ३३%
बीएमएस (कॉमर्स )    ८६.५%

Web Title: Falling to second degree list of degrees, waiting for third list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.