अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज; पहिल्या फेरीसाठी ३.७५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 08:14 AM2021-08-27T08:14:13+5:302021-08-27T08:15:18+5:30

अंतर्गत मूल्यमापनामुळे यंदा दहावीच्या निकालात वाढ झाली असून, अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा तीव्र झाली आहे.

The first list of the eleventh standard admission today | अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज; पहिल्या फेरीसाठी ३.७५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज; पहिल्या फेरीसाठी ३.७५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीचा निकाल लागूनही अकरावी प्रवेशासाठी ताटकळत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी अखेर शुक्रवारी जाहीर होणार आहे. शिक्षण संचालनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या फेरीसाठी या पाच विभागांतून एकूण ३ लाख ७५ हजार ३५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामधील ३ लाख ६ हजार १११ विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीसाठी अर्ज स्वीकृती झाली आहे. वरील पाच विभागात एकूण ५ लाख २८ हजार ६०० जागा उपलब्ध आहेत.

अंतर्गत मूल्यमापनामुळे यंदा दहावीच्या निकालात वाढ झाली असून, अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा तीव्र झाली आहे. अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली. तसेच, प्रचलित पद्धतीने सहा आठवड्यांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश राबविण्यात येत असून, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जाणार आहे.

पहिल्या पसंतीक्रमास प्रवेश बंधनकारक
पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पहिला पसंतीक्रम मिळाला असल्यास विद्यार्थ्याला प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच प्रवेश घेऊन एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश रद्द करायचा असल्यास त्या विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या परवानगीने रद्द करता येईल. मात्र त्याला पुढील फेऱ्यांसाठी प्रवेश बंद होणार असून त्याला ही विशेष फेरीसाठी थांबावे लागणार आहे.
 

Web Title: The first list of the eleventh standard admission today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.