कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांसाठी माेफत शिक्षण! पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 11:55 AM2021-05-29T11:55:33+5:302021-05-29T11:56:06+5:30

Education News: ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे आईवडील कोरोनामुळे गमवावे लागले आहेत, त्यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास शालेय शिक्षण विभागाने तयारी दाखविली आहे.

Free education for children who have lost their parents due to corona! Proposals for 1st to 12th students | कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांसाठी माेफत शिक्षण! पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्ताव

कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांसाठी माेफत शिक्षण! पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्ताव

Next

मुंबई : ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे आईवडील कोरोनामुळे गमवावे लागले आहेत, त्यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास शालेय शिक्षण विभागाने तयारी दाखविली आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे नियाेजन त्यांनी केले असून यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडला आहे. 

अनेक विद्यार्थ्यांच्या आईवडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काेराेनामुळेे आधीच मानसिकतेवर झालेला आघात आणि त्यातच आईवडिलांचा आधारही हरपल्याने या विद्यार्थ्यांची स्थिती दयनीय आहे. त्यांना अनेक आर्थिक अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे.  अशा विद्यार्थ्यांचे पैशांअभावी  शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे मत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रस्तावात मांडले. याच पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीतील अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीच्या नियोजनाचा प्रस्ताव मांडल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. 

 

Web Title: Free education for children who have lost their parents due to corona! Proposals for 1st to 12th students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.