आयटीआयमध्ये मुलींचे ‘पुढचे पाऊल’; प्रवेशांत वाढला ओघ, व्यावसायिक आघाडी गाजविण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 06:20 AM2021-12-31T06:20:51+5:302021-12-31T06:21:25+5:30

ITI : २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांना २१,२२२ मुलींनी प्रवेश घेतला होता. मात्र, २०१९मध्ये हीच संख्या १८,८९५ इतकी कमी झाली. २०२१मध्ये अवघ्या १६,९३४ विद्यार्थिनींनी आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला.

Girls 'next step' in ITI; Increased flow in admissions, ready to dominate the business | आयटीआयमध्ये मुलींचे ‘पुढचे पाऊल’; प्रवेशांत वाढला ओघ, व्यावसायिक आघाडी गाजविण्यासाठी सज्ज

आयटीआयमध्ये मुलींचे ‘पुढचे पाऊल’; प्रवेशांत वाढला ओघ, व्यावसायिक आघाडी गाजविण्यासाठी सज्ज

googlenewsNext

-  सीमा महांगडे 

मुंबई : परीक्षेत कमी गुण मिळालेले विद्यार्थी आणि विशेषतः मुलेच आयटीआयकडे वळत असल्याचे चित्र आणि समज गेल्या काही वर्षांपासून बदलत आहे. यंदा आयटीआयमधील सॉफ्ट ट्रेडसोबत हार्ड ट्रेड प्रवेशासाठीही आता मुली पसंती दर्शवत असल्याचे प्रवेशातील टक्केवारीवरून दिसत आहे. मुलींच्या टक्क्यात झालेली वाढ महिला सबलीकरणाच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याची प्रतिक्रिया आयटीआयचे संचालक दिगंबर दळवी यांनी दिली. 

आजवर काही ठराविक ट्रेडलाच मुलींसाठी आयटीआयमध्ये प्रवेश दिला जात होता. परंतु गेल्या पाच-सात वर्षात मशिन ट्रेडलाही मुलींचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय वायरमन, इलेक्ट्रीशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टेनो मराठी, इंग्रजी, हिंदी या ट्रेडला प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढत आहे. हार्डकोअर ट्रेडला मुलींच्या प्रवेशाचे आणि त्यांना उद्योगांत मिळत असलेल्या संधीचे प्रमाण लक्षात घेता मुलींना अधिकाधिक चांगली संधी मिळावी, यासाठी त्यांची प्रवेशाची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना संस्थांना देऊन त्यांच्याकडून तसे प्रयत्न करून घेतल्याची माहिती दळवी यांनी दिली.

२०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांना २१,२२२ मुलींनी प्रवेश घेतला होता. मात्र, २०१९मध्ये हीच संख्या १८,८९५ इतकी कमी झाली. २०२१मध्ये अवघ्या १६,९३४ विद्यार्थिनींनी आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला.

मागील वर्षी आणि या वर्षीची  प्रवेशातील मुलींची आकडेवारी

विभाग           शासकीय आयटीआय    खासगी आयटीआय
               २०२१-२२    २०२०-२१    २०२१-२२    २०२०-२१
मुंबई      २१४७      २७४६    २१९०     ७१
पुणे      १६७९       १९५८     ३३२    ३१९
नाशिक      २३१९     २७०९     २३०     ३१०
औरंगाबाद      २४५१     २८५८    २३४     २६२
अमरावती      ३५१०    ४१७५    १११    ९९
नागपूर      ३३२९    ३७५४     ५०८      ५०४
एकूण      १५४३५    १८२००    १४९९     १५६५

राज्यातील मुलांसह मुलीही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी कौशल्यक्षम अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभाग प्रयत्नशील आहे. आयटीआयमधील विद्यार्थिनींसाठी बदलते ट्रेंड आणि संधी, यूएन वुमनसोबतचा फ्लाईट प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. व्यावसायिक शिक्षणातील महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या दृष्टीने आयटीआय प्रवेशात वाढ ही उत्तम सुरुवात आहे.
-मनीषा वर्मा, प्रधान सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग 
 

Web Title: Girls 'next step' in ITI; Increased flow in admissions, ready to dominate the business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.