Goa Board Class 12th result: गोवा बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येईल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 07:23 PM2021-07-18T19:23:08+5:302021-07-18T19:25:12+5:30

Goa Board Class 12th result: गोव्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून (GBSHSE) इयत्ता १२ वीचा (HSSC) निकाल उद्या १९ जुलै रोजी दुपारी ५ वाजता जाहीर होणार आहे.

Goa board to declare hssc march 2021 resulets tomorrow at 5 pm | Goa Board Class 12th result: गोवा बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येईल? जाणून घ्या...

Goa Board Class 12th result: गोवा बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येईल? जाणून घ्या...

Next

Goa Board Class 12th result: गोव्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून (GBSHSE) इयत्ता १२ वीचा (HSSC) निकाल उद्या १९ जुलै रोजी दुपारी ५ वाजता जाहीर होणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागानं याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना https://gbshse.gov.in/ या वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. 

गोवा शिक्षण बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाल्याचं वृत्त सोशल मीडियात व्हायरल झालं होतं. पण त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. (Goa board to declare hssc march 2021 resulets tomorrow at 5 pm)

"गोवा शिक्षण विभागाचा इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाल्याच्या बातम्या काही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. पण त्या पूर्णपणे फेक असून अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. निकालाबाबतची घोषणा शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जाईल", अशी माहिती गोवा बोर्डाचे अध्यक्ष भागीरथ शेट्ये यांनी दिली होती. अखेर सोमवारी निकाल जाहीर होणार असल्याचं शिक्षण मंडळातून जाहीर करण्यात आलं आहे. 

कुठे पाहता येणार निकाल?
गोवा शिक्षण बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रत https://gbshse.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा सीट क्रमांक, जन्मतारीख, शाळेचा अनुक्रमांक आणि विद्यार्थ्याचं नाव अशी माहिती भरावी लागणार आहे. 

Web Title: Goa board to declare hssc march 2021 resulets tomorrow at 5 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.