पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार 1.4 लाख, लगेच करा अर्ज...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 08:34 PM2023-10-10T20:34:43+5:302023-10-10T20:35:55+5:30
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे.
Govt Job:सरकारीनोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने प्रोबेशनरी इंजिनीअर, प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी अकाउंटंट पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. ही कंपनी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. ही सैन्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तयार करते.
वयोमर्यादा आणि महत्त्वाच्या तारखा
प्रोबेशनरी इंजिनीअर आणि प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 25 वर्षे आणि प्रोबेशनरी अकाउंटंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 4 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली असून, उमेदवार 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या तिन्ही विभागात एकूण 232 पदे भरली जाणार आहेत. प्रोबेशनरी इंजिनिअरच्या 205 जागांवर भरती होणार आहे, तर प्रोबेशनरी ऑफिसरची 12 पदे आणि प्रोबेशनरी अकाउंटंट ऑफिसरची 15 पदे भरण्यात येणार आहेत. प्रोबेशनरी इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे BE, BTech, B.sc अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पीजी केलेले असावे. तसेच मानव संसाधन विषयातील पदवी असावी. प्रोबेशनरी अकाउंटंटसाठी उमेदवारांनी सीए आणि सीएमए फायनल असणे आवश्यक आहे.
अर्ज फी आणि पगार
जनरल, EWS, OBC, NCL कॅटेगरीतील उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल, तर SC, ST, PH आणि EWS कॅटेगरीतील उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतो. निवडलेल्या उमेदवारांना 40,000 ते 1,40,000 रुपये मासिक वेतन मिळेल. निवडलेल्या उमेदवारांना बंगळुरू, महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तराखंड सारख्या ठिकाणी नियुक्त केले जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी bel-india.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.