सर्वोच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी! पगार 44,900 रुपये; असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 06:19 PM2021-02-17T18:19:18+5:302021-02-17T18:24:09+5:30

सर्वोच्च न्यायालयातील या पदासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 15 फेब्रुवारी 2021 पासून अर्ज करायला सुरुवात झाली आहे. नोकरी मिळणाऱ्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे इंग्रजीत भाषांतर करावे लागेल. (Supreme Court Recruitment 2021)

Govt job vacancy in supreme court sc junior translator recruitment 2021salary rs 44900 | सर्वोच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी! पगार 44,900 रुपये; असा करा अर्ज

सर्वोच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी! पगार 44,900 रुपये; असा करा अर्ज

googlenewsNext


नवी दिल्ली - आपल्याला भाषेची चांगली जाण असेल आणि त्या भाषेचा आपण अभ्यास केला असेल, तर आपल्याला देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात कोर्ट सहाय्यक/कनिष्ठ अनुवादक पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. (Job Opportunities In The Supreme Court)

या पदांवर नियुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला लेखी परीक्षा आणि मुलाखतीत यशस्वी व्हावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे इंग्रजीत भाषांतर करावे लागेल. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नोटिफिकेशन आणि अॅप्लीकेशन फॉर्मच्या लिंक्स पुढे देण्यात आल्या आहेत. 

पदाचे नाव – कोर्ट सहाय्यक (कनिष्ठ अनुवादक)
पदांची संख्या – 30
वेतनश्रेणी – दरमहा 44,900 रुपये (लेव्हल-7 प्रमाणे इतर भत्त्यांसह पगार मिळेल.)

Government Job : UCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

भाषा निहाय रिक्त पदे? -
इंग्रजी ते हिंदी – 05
आसामी – 02
बंगाली – 02
तेलगू – 02
गुजराती – 02
उर्दू – 02
मराठी – 02
तमीळ – 02
कन्नड – 02
मल्याळम – 02
मणिपुरी – 02
उडिया – 02
पंजाबी – 02
नेपाळी – 01

Sarkari Naukri : परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळविण्याची संधी, 22 फेब्रुवारीच्या आधी करा अर्ज

आवश्यक पात्रता -
इंग्रजी आणि संबंधित भाषेतील पदवीधर असावा. ट्रान्सलेशनचा डिप्लोमा अथवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे. तसेच केंद्र सरकारच्या नियमानुसार वयात सूट देण्यात येईल. 

असा करा अर्ज -
सर्वोच्च न्यायालयातील या पदासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 15 फेब्रुवारी 2021 पासून अर्ज करायला सुरुवात झाली आहे. 13 मार्च 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये, तर एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी 250 रुपये आहे.

संबंधित लिंक -

Supreme Court Junior Translator Job Notification साठी येथे क्लिक करा.
Apply करण्यासाठी येथे क्लिक करा.
SC च्या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
 

Web Title: Govt job vacancy in supreme court sc junior translator recruitment 2021salary rs 44900

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.