HCL Recruitment 2023: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्ण संधी; पगार 1 लाख 80 हजार, जाणून घ्या माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 03:39 PM2023-02-20T15:39:19+5:302023-02-20T15:39:36+5:30

HCL Recruitment 2023: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये भरती निघाली असून, अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे.

HCL Recruitment 2023: Golden Job Opportunity in Govt Company; Salary 1 lakh 80 thousand, know details | HCL Recruitment 2023: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्ण संधी; पगार 1 लाख 80 हजार, जाणून घ्या माहिती...

HCL Recruitment 2023: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्ण संधी; पगार 1 लाख 80 हजार, जाणून घ्या माहिती...

googlenewsNext

HCL Recruitment 2023: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड(HCL) जी एक सरकारी कंपनी आहे, यात विविध व्यवस्थापक पदांसाठी भरती निघाली आहे. ही भरती डेप्युटी मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि मॅनेजमेंट ट्रेनी स्तरावरील पदांवर केली जात आहे. या अंतर्गत विविध विषयात पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला भरतीच्या रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, पगार, निवड प्रक्रिया याविषयी माहिती देणार आहोत.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करावे लागतील. हे अर्ज अधिकृत वेबसाइट hindustancopper.com वरुन करता येतील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे.

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ व्यवस्थापक - भूविज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी
डेप्युटी मॅनेजर सर्व्हे – खाणकाम / स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी
डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल - अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील पदवी
डेप्युटी मॅनेजर R&D - केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा रसायनशास्त्रात पदव्युत्तर

वय 
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी 28 वर्षे, वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी 47 आणि उपव्यवस्थापक पदांसाठी कमाल 40 वर्षे वयाचे उमेदवार अर्ज सादर करू शकतात.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांना ₹500 अर्ज शुल्क देखील जमा करावे लागेल.

पगार

वरिष्ठ व्यवस्थापक - 70000 ते 180000
डेप्युटी मॅनेजर - 40000-140000
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 40000-140000

Web Title: HCL Recruitment 2023: Golden Job Opportunity in Govt Company; Salary 1 lakh 80 thousand, know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.