हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी; अग्निवीरवायू भरती 2025 ची अधिसूचना जारी, पाहा पात्रता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 18:44 IST2024-12-19T18:43:40+5:302024-12-19T18:44:36+5:30

भारतीय हवाई दलाने अग्निवीरवायू भरती 2025 ची अधिसूचना जारी केली आहे. अर्जाची प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू होईल.

IAF Agniveervayu Notification 2025: Golden opportunity to work in the Air Force; Notification for Agniveervayu Recruitment 2025 released, see eligibility... | हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी; अग्निवीरवायू भरती 2025 ची अधिसूचना जारी, पाहा पात्रता...

हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी; अग्निवीरवायू भरती 2025 ची अधिसूचना जारी, पाहा पात्रता...

IAF Agniveervayu Notification 2025 :भारतीय हवाई दल (IAF) ने 'अग्निवीर'वायू 2025 भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 पर्यंत चालेल. इच्छूक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in द्वारे अर्ज करू शकतात. अग्निवीरवायू बनण्यासाठी पात्रता काय आहे, हे जाणून घ्या...

कोण अर्ज करू शकतो?
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराची जन्मतारीख 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008 दरम्यान असावी. उमेदवार विज्ञान शाखेतील असावा आणि त्याने गणित आणि भौतिकशास्त्रासह 12वीत किमान 50% गुण मिळवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराने इंग्रजीतदेखील 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 50% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा करणारे उमेदवारदेखील अर्ज करू शकतात. अधिक पात्रता संबंधित माहितीसाठी उमेदवाराने अधिसूचना पाहावी.

अर्ज फी?
नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना 550 रुपये परीक्षा शुल्क आणि जीएसटी भरावा लागेल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अर्जाची फी भरली जाऊ शकते.

अर्ज कसा करावा?
agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
अग्निवीरवायू भर्ती 2025 च्या लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि अर्ज भरून आपली कागदपत्रे अपलोड करा.
फी भरा आणि सबमिट करा.

निवड कशी केली जाईल?
CBT परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे अग्निवीरवायू पदांसाठी अर्जदारांची निवड केली जाईल. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.

Web Title: IAF Agniveervayu Notification 2025: Golden opportunity to work in the Air Force; Notification for Agniveervayu Recruitment 2025 released, see eligibility...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.