IAS Anna Rajam Malhotra: 'या' आहेत स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला IAS, अडचणींवर मात करुन मिळवले होते पद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 04:29 PM2023-01-05T16:29:02+5:302023-01-05T16:29:37+5:30

IAS Anna Rajam Malhotra: त्यांच्या नियुक्ती पत्रावर लिहिले होते- 'नोकरीवर असताना लग्न केल्यास निलंबित केले जाईल..!'

IAS Anna Rajam Malhotra is independent India's first female IAS | IAS Anna Rajam Malhotra: 'या' आहेत स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला IAS, अडचणींवर मात करुन मिळवले होते पद

IAS Anna Rajam Malhotra: 'या' आहेत स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला IAS, अडचणींवर मात करुन मिळवले होते पद

Next

First Woman IAS of India: अन्ना राजम मल्होत्रा (IAS Anna Rajam Malhotra) ​​या भारताच्या पहिल्या महिला IAS अधिकारी होत्या (1951). त्या भारताच्या पहिल्या महिला सचिवदेखली होत्या. अन्ना यांचा जन्म निराणम, पथनमथिट्टा येथे झाला होता. एवढेच नाही तर नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला ठरल्या. 1951 मध्ये अन्ना राजम आयएएसमध्ये सामील झाल्या आणि त्यांचे बॅचमेट आर एन मल्होत्रा ​​यांच्याशी लग्न केले. अन्ना मल्होत्रा ​​यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सी. राजगोपालाचारी यांच्या अंतर्गत आणि केंद्रात 1951-2018 पर्यंत IAS अधिकारी म्हणून काम केले.

भारतातील पहिल्या महिला आयएएस अन्ना राजम मल्होत्रा यांची सन 1951 मध्ये मद्रास राज्यात नागरी सेवक म्हणून नियुक्ती झाली होती. स्वतंत्र भारतातील त्या पहिल्या महिला IAS अधिकारी होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सात मुख्यमंत्र्यांसोबत काम केले. याशिवाय त्यांनी राजीव गांधी यांच्यासोबतही काम केले होते. त्यांनी आपले शिक्षण प्रोव्हिडन्स कॉलेजमध्ये पूर्ण केले, मलबार ख्रिश्चन कॉलेजमधून पदवी आणि मद्रास विद्यापीठातून साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली. 

रायफल, घोडेस्वारी आणि पिस्तुल नेमबाजीचा सराव करुन त्यांनी आपले कौशल्य वाढवले. अन्ना राजम यांना 1989 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला. अन्ना यांना आपल्या करिअरमध्ये अनेक अडचणी आल्या. जेव्हा त्या नागरी सेवा मुलाखतीसाठी पोहोचल्या तेव्हा मंडळाच्या सदस्यांनी त्यांना या क्षेत्रात येऊ नका असा सल्ला दिला होता. त्यांना फॉरेन सर्व्हिस आणि सेंट्रल सर्व्हिसेसमधून दुसरा कोणताही पर्याय निवडण्यास सांगण्यात आले होते. कारण, पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. अन्ना 1951 मध्ये सेवेत रुजू झाल्या, तेव्हा त्यांच्या नियुक्ती पत्रावर लिहिले होते, 'लग्न केल्यास तुम्हाला निलंबित केले जाऊ शकते.' त्या काळात पदावर असताना लग्नाची परवानगी नव्हती. त्या सेवेत रुजू झाल्या आणि काही वर्षांनी जेव्हा नियम बदलले तेव्हा तर्यांनी बॅचमेट आर एन मल्होत्रासोबत लग्न केले.

Web Title: IAS Anna Rajam Malhotra is independent India's first female IAS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.