IAS Success Story:'भाऊ आर्मीत गेला अन् उरी हल्ला झाला; त्याच क्षणी ठरवलं' वाचा IAS दिव्या मिश्राची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 02:02 PM2023-02-17T14:02:29+5:302023-02-17T14:12:56+5:30
IAS Success Story: IAS दिव्या मिश्राने UPSC सारखी कठीण परीक्षा मेहनतीने आणि समर्पणाने उत्तीर्ण केली.
IAS Success Story: दरवर्षी लाखो विद्यार्थी नागरी सेवा परीक्षा (UPSC Exam) देतात, परंतु केवळ काहीशे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विद्यार्थ्याबद्दल सांगणार आहोत, जिने ही कठीण परीक्षा तिच्या मेहनतीने आणि समर्पणाने उत्तीर्ण केली. भारतीय लष्करावर (Indian Army) उरीमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे (Uri Attack) तिला IAS होण्याची प्रेरणा मिळाली.
आम्ही IAS दिव्या मिश्रा हिच्याविषयी (Divya Mishra) बोलत आहोत. तिने आपला भाऊ सैन्यात भरती झाल्याचे पाहून नागरी सेवा परीक्षा देऊन देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. तिला लहानपणापासूनच UPSC परीक्षेविषयी आकर्षण होते, पण काही वर्षांपूर्वी झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्याने तिचा निश्चय अधिक पक्का झाला.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत IAS दिव्या सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करण्याच्या प्रश्नावर म्हणाली- माझ्या भावाची भारतीय सैन्यात निवड झाली होती. तो सध्या लेफ्टनंट पदावर आहेत. माझ्या कुटुंबातील कोणीही संरक्षण दलात गेले नाही. अशा परिस्थितीत भाऊ गेल्यानंतर एक वेगळाच अनुभव आला. यातच उरी हल्ला झाला. यामुळे माझ्यात एक वेगळीच भावना निर्माण झाली आणि मला नागरी सेवेत रुजू होण्यास प्रवृत्त केले. मलाही माझ्या पद्धतीने देशाची सेवा करायची होती.
कोण आहे दिव्या मिश्रा?
दिव्या मिश्रा मूळची उत्तर प्रदेशातील कानपूरची आहे. तिचे आई-वडील शिक्षक आहेत. घरात शिक्षणाचे वातावरण आहे. दिव्याने तिचे सुरुवातीचे शिक्षण उन्नाव जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातून केले. यानंतर तिने बीटेक केले आणि एका कंपनीत 3 वर्षे कामही केले. यासोबतच तिने आयआयएममधून पीएचडीही केली आहे. अभ्यासात ती नेहमीच टॉपर राहिली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात दिव्याला यूपीएससी परीक्षेत अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागले. तिने UPSC ची तयारी सुरू केली, पण पहिल्या प्रयत्नात 4 गुणांनी अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नात तिने परीक्षा उत्तीर्ण केली, पण कमी रँकमुळे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, 2020 मध्ये दिव्याने तिसर्या प्रयत्नात तिचे स्वप्न पूर्ण केले. यावेळी तिने 28 वी रँक मिळवली आणि ती आयएएस अधिकारी बनली.