आयडॉलची चलती, १६ हजारांहून अधिक प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 07:43 AM2022-08-01T07:43:36+5:302022-08-01T07:43:46+5:30

३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा 

Idol's move, more than 16 thousand hits in Mumbai University | आयडॉलची चलती, १६ हजारांहून अधिक प्रवेश

आयडॉलची चलती, १६ हजारांहून अधिक प्रवेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या जुलै सत्राच्या प्रवेशास ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.  जुलै सत्राचे प्रवेश २५ जूनपासून सुरू झाले असून आजपर्यंत या सत्रात १६ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेतला आहे.  

 पदवीस्तरावरील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँड फायनान्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम  व  पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्प्युटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश आजपासून सुरू होत असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे. हे प्रवेश ऑनलाइन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

एमएचे प्रस्तावित तीन नवे अभ्यासक्रम 
यावर्षी एमए मानसशास्त्र, एमए संज्ञापन व पत्रकारिता आणि  एमए जनसंपर्क हे तीन अभ्यासक्रम मान्यतेसाठी यूजीसीकडे पाठविण्यात आले असून, या अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता मिळाल्यानंतर हे तीन अभ्यासक्रम याच शैक्षणिक वर्षात सुरू केले जातील, असे संस्थेचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले. 

बीए मानसशास्त्र विषय सुरू
 बीएमध्ये मानसशास्त्र विषयाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक महाविद्यालयांत तृतीय वर्षी बीएमध्ये मानसशास्त्राचे सहा पेपर उपलब्ध नसल्याने विद्यार्थी मानसशास्त्रापासून वंचित राहतात. यावर्षीपासून आयडॉलमध्ये मानसशास्त्राचे सहा पेपर सुरू करण्यात येत आहे. 
एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस-एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमाला दूरस्थ माध्यमातून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यानुसार एमएमएस-एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमासाठी आयडॉल लवकरच प्रवेश परीक्षा घेणार आहे. 
एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस-एमबीएसाठी ७२० जागा, तर एमसीएसाठी २००० जागांना मान्यता दिली आहे. याला यूजीसीची मान्यता मिळाल्यानंतर त्याची प्रवेश परीक्षा घेण्यात येईल.
विभागीय उपकेंद्रावर मार्गदर्शन व अध्ययन साहित्य वितरण आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे. 

एमएचे प्रस्तावित
तीन नवे अभ्यासक्रम 

यावर्षी एमए मानसशास्त्र, एमए संज्ञापन व पत्रकारिता आणि  एमए जनसंपर्क हे तीन अभ्यासक्रम मान्यतेसाठी यूजीसीकडे पाठविण्यात आले असून, या अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता मिळाल्यानंतर हे तीन अभ्यासक्रम याच शैक्षणिक वर्षात सुरू केले जातील, असे संस्थेचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले. 

Web Title: Idol's move, more than 16 thousand hits in Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.