NIRF रॅकिंगमध्ये देशात IIT मुंबई देशात तिसरे; केंद्रीय शिक्षण विभागाकडून जाहीर
By सीमा महांगडे | Published: July 15, 2022 02:35 PM2022-07-15T14:35:57+5:302022-07-15T14:36:18+5:30
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून एनआयआरएफ रँकिंग जाहीर, ओव्हर ऑल रँकिंगमध्ये आयआयटी मुंबई देशात तिसरे
मुंबई - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शैक्षणिक संस्था व विद्यापीठाच्या देश पातळीवरील क्रमवारी जाहीर केली असून पहिल्या 50 विद्यापीठांमध्ये राज्यातील मुंबई व पुण्याच्या 6 विद्यापीठांचा समावेश आहे. पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ नवव्या स्थानावर असून मुंबी विद्यापीठ 45 व्या स्थानावर आहे. शैक्षणिक संस्थांच्या ओव्हर ऑल रँकिंगमध्ये आयआयटी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविण्यात यशस्वी झाले आहे.
सर्वोत्तम महाविद्यालयांच्या क्रमवारीत पहिल्या 50 महाविद्यालयात राज्यातील एकही महाविद्यालयाचा समावेश नसून पुण्याचे फर्ग्युसन महाविद्यालय ( स्वायत्त) 57 व्या तर मुंबईचे कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन 69 व्या स्थानावर आहे.