IIT Without JEE: जेईई न देताच आयआयटीमध्ये प्रवेशाची संधी; 12 वी पास अर्ज करा, वयाची देखील अट नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 08:14 PM2021-08-09T20:14:26+5:302021-08-09T20:15:30+5:30

Career after 12th: आय़आयटी मद्रास (IIT Madras) तुम्हाला डायरेक्ट प्रवेश देण्याची संधी देत आहे. नवीन बॅचसाठी अर्जदेखील जारी करण्यात आले आहेत. जाणून घ्या कोर्स आणि प्रवेशाची माहिती. 

IIT Without JEE: Opportunity to admission in IIT without JEE; Apply for 12th pass, no age limit | IIT Without JEE: जेईई न देताच आयआयटीमध्ये प्रवेशाची संधी; 12 वी पास अर्ज करा, वयाची देखील अट नाही

IIT Without JEE: जेईई न देताच आयआयटीमध्ये प्रवेशाची संधी; 12 वी पास अर्ज करा, वयाची देखील अट नाही

googlenewsNext

आयआयटीमध्ये शिकायची इच्छा आहे, परंतू अॅडमिशन कसे मिळेल. हे स्वप्न आरामात पूर्ण करण्याची संधी चालून आली आहे. यासाठी तुम्हाला जेईई मेन (JEE Mains) किंवा जेईई एडवांस्ड (JEE Advanced) परीक्षा देण्याची गरज नाहीय. जर तुम्ही १२ वी पास असाल तर तेवढेच बास आहे. (How to take admission in IIT without JEE Exam: IIT Direct admission 2021)

आय़आयटी मद्रास (IIT Madras) तुम्हाला डायरेक्ट प्रवेश देण्याची संधी देत आहे. नवीन बॅचसाठी अर्जदेखील जारी करण्यात आले आहेत. जाणून घ्या कोर्स आणि प्रवेशाची माहिती. 

आयआयटी मद्रासने तीन प्रकारचे कोर्स जाहीर केले आहेत. यासाठी अर्ज ओपन करण्यात आले आहेत. 

  • फाउंडेशन+डिप्लोमा इन प्रोग्रामिंग (Diploma in Programming)
  • फाउंडेशन+डिप्लोमा इन डाटा सायंस (Diploma in Data Science)
  • बीएससी इन प्रोग्रामिंग अँड डाटा सायंस (BSc in Programming and Data Science)
     

हे तिन्ही कोर्स ऑनलाईन घेतले जाणार आहेत. यासाठी नवीन बॅच सप्टेंबर 2021 पासून सुरु होत आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्जासाठी लिंक देण्यात आली आहे. यावर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता. सोबतच तीन कोर्सची पूर्ण डिटेल मिळवू शकता.

IIT Madras Online Course eligibility या कोर्सची खास बाब म्हणजे यासाठी वयाची कोणतीही अट नाही. वय कितीही असले तरी विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकणार आहेत. फक्त मान्यताप्राप्त बोर्डाकडून 12 वी परीक्षा पास केलेली असणे बंधनकारक आहे. तसेच कोणत्यातरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असायला हवा. जे विद्यार्थी आता 12 वी पास झाले आहेत, त्यांच्यासाठी कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी जानेवारी 2022 पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. 

डाटा सायन्स कोर्ससाठी 10 वी मध्ये गणित आणि इंग्रजी विषय असणे गरजेचे आहे. 

IIT Madras Online Degree Courses बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी इथे क्लिक करा...

Online Apply करण्य़ासाठी इथे क्लिक करा...

Web Title: IIT Without JEE: Opportunity to admission in IIT without JEE; Apply for 12th pass, no age limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.