Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी; पात्रता 12वी पास, पगार 63200; अधिसूचना जारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 03:19 PM2022-07-29T15:19:35+5:302022-07-29T15:19:42+5:30

Indian Army Recruitment 2022: इंडियन आर्मी एअर डिफेन्स सेंटर रिक्रूटमेंटने एलडीसी पदासाठी अधिसूचना जारी केली आहे.

Indian Army Recruitment 2022: Job Opportunity in Indian Army; Qualification 12th Pass, Salary 63200; Notification Issued | Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी; पात्रता 12वी पास, पगार 63200; अधिसूचना जारी...

Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी; पात्रता 12वी पास, पगार 63200; अधिसूचना जारी...

googlenewsNext

Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात क्लार्क पदासाठी भरती निघाली आहे. इंडियन आर्मी एअर डिफेन्स सेंटर रिक्रूटमेंटने 16 जुलै ते 22 जुलै 2022 रोजीच्या रोजगार वृत्तपत्रात लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 12वी पास उमेदवार आर्मी एअर डिफेन्स सेंटर भर्ती 2022 साठी अर्ज करू शकतात. 

उमेदवाराला टायपिंग गरजेची
रोजगार समाचारमध्ये अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करता येईल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12वी पास असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवाराचा हिंदीमध्ये टायपिंगचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये टायपिंगचा वेग 35 शब्द प्रति मिनिट यायला हवा. 

अशी होईल निवड
या पदांसाठीच्या किमान वय 18 आणि कमाल वय 25 वर्षे ठेवण्यात आले आहे. या पदासाठी निवड दोन टप्प्यात होईल. उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि टायपिंग चाचणीच्या आधारे केली जाईल. परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती, संख्यात्मक योग्यता, सामान्य इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयांचे प्रश्न असतील. पेपर सोडवण्यासाठी 2 तास मिळतील.

पदासाठी अप्लाय कसे करावे
पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात. अर्ज पाठवताना, तो LDC पदासाठी आहे असे लिहावे लागेल. तुम्हाला तुमचा भरलेला फॉर्म कमांडंट, आर्मी एडी सेंटर, गंजम (ओडिशा) पिन - 761052 वर पाठवावा लागेल. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी संबंधित साईटवर जावे.

Web Title: Indian Army Recruitment 2022: Job Opportunity in Indian Army; Qualification 12th Pass, Salary 63200; Notification Issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.