Interview Questions: विचार करा, तुम्ही जहाजात आहात अन् ते बुडायला लागलं, कसं वाचाल?; 'हे' आहे स्मार्ट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 12:16 PM2022-03-04T12:16:09+5:302022-03-04T12:16:22+5:30
मुलाखतीत काही प्रश्न खूप चॅलेजिंग असतात तर काही प्रश्नांची उत्तरं तुमच्या हजरजबाबीपणावर निर्भर असतात.
नवी दिल्ली – अनेकदा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी युवक-युवती धडपडत असतात. काहीजण प्रचंड मेहनत घेत सरकारी नोकरी मिळवण्याची जिद्द उराशी बाळगतात. सरकारी नोकरी असो वा खासगी कर्मचारी हजरजबाबी असला तर त्याला यश मिळतेच. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी UPSC, MPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षा द्याव्या लागतात. त्या परीक्षेत पास झाल्यानंतर मुलाखतीचं कठिण आव्हान उमेदवारांसमोर असतं.
मुलाखतीत काही प्रश्न खूप चॅलेजिंग असतात तर काही प्रश्नांची उत्तरं तुमच्या हजरजबाबीपणावर निर्भर असतात. मुलाखत घेणारा व्यक्ती उमेदवारांची निवड त्याच आधारे करतो. उमेदवार किती चाणाक्ष्य आहे आणि स्वत:च्या डोक्याने कसा निर्णय घेतो हे मुलाखतीत पाहिलं जातं. आता मुलाखतीत येणाऱ्या गुगली प्रश्नांवर काही उमेदवारांची भंबेरी उडते. त्यामुळे परीक्षेत पास होऊनही त्यांना प्रतिक्षा करावी लागते. आज आम्ही तुम्हाला असे प्रश्न-उत्तर सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही स्मार्टली मुलाखतीत उत्तरं देऊ शकता.
प्रश्न – एका वर्षात किती मिनिट्सं असतात?
उत्तर – ५, २५, ६०० मिनिट्स
प्रश्न – अशा देशाचं नाव सांगा, ज्याठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्ट पूर्णपणे मोफत आहे?
उत्तर – लक्जमबर्ग
प्रश्न – आयपीचं फुल फॉर्म काय आहे?
उत्तर – इंटनेट प्रोटोकॉल
प्रश्न – अशा रेल्वे स्टेशनचं नाव सांगा, जे २ राज्यांमध्ये अर्ध-अर्ध विभागलं आहे?
उत्तर – महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवर असं एक रेल्वे स्टेशन आहे ज्याचं नाव नवापूर आहे. नवापूर रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्र आणि गुजरात या २ राज्यांमध्ये विभागलं आहे.
प्रश्न - गुलाब, झेंडू आणि सूर्यफुलामध्ये काय साम्य आहे?
उत्तर- तिन्ही फुले आहेत.
प्रश्न – विचार करा, तुम्ही एका जहाजात प्रवास करताय आणि ते बुडायला लागलं तर काय कराल?
उत्तर – मुख्य म्हणजे या प्रश्नातून मुलाखत घेणारा व्यक्ती उमेदवारांमधील हजरजबाबीपणा पाहतो. उमेदवार या प्रश्नावर उत्तर देतो की, मी विचार करणं बंद करेन
प्रश्न – असा कोणता देश आहे ज्याठिकाणी दरवर्षी राष्ट्रपती निवडला जाईल?
उत्तर – स्विझरलँड
प्रश्न - कोणता प्राणी कडुलिंबापेक्षा उंच उडी मारू शकतो?
उत्तर- कडुलिंबाच्या झाडावरून उडी मारणारा प्राणी नाही. वास्तविक, कडुलिंबाच्या झाडालाही उडी मारता येत नाही.