Interview Questions: 'असा' कोणता प्राणी आहे जो दूध आणि अंडी दोन्ही देतो?; जाणून घ्या प्रश्नाचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 10:47 AM2022-02-28T10:47:42+5:302022-02-28T10:47:59+5:30
मुलाखतीवेळी आसपासच्या घटना, वस्तूशी निगडीत प्रश्न केले जातात. हे प्रश्न विचित्र असतात. त्यामुळे त्याचे उत्तर देणाऱ्याची कसोटी लागते.
नवी दिल्ली – सरकारी नोकरीसाठी अनेक युवक-युवती बरीच वर्ष तयारी असतात. त्यात UPSC च्या मुलाखतीला गेल्यावर तेथील अधिकाऱ्यांचे प्रश्न ऐकून हुशार विद्यार्थीही काहीवेळ गडबडून जातात. सरळ प्रश्नाचं चुकीचं उत्तर देऊन उमेदवार फसतात. हे प्रश्न उमेदवाराचा आयक्यू लेवल चेक करण्यासाठी विचारले जातात. मुलाखतीवेळी आसपासच्या घटना, वस्तूशी निगडीत प्रश्न केले जातात. हे प्रश्न विचित्र असतात. त्यामुळे त्याचे उत्तर देणाऱ्याची कसोटी लागते.
नेमकं काय प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तरं काय हे जाणून घेऊया
प्रश्न – असा कोणता प्राणी आहे जे दूध आणि अंड दोन्ही देतो?
उत्तर – प्लॅटिपस(हा प्राणी ऑस्ट्रेलियात आढळतो)
प्रश्न – माऊंट एव्हरेस्टच्या शोधापूर्वी कोणता माऊंटेन सर्वात उंच होता?
उत्तर – माऊंट एव्हरेस्ट
प्रश्न – कोणत्या देशात दोन प्रेसिडेंट असतात?
उत्तर - सॅन मारिनो
प्रश्न – अशी कोणती वस्तू आहे जी थंडीतही विरघळते?
उत्तर – मेणबत्ती
प्रश्न – कुठल्या देशात दरवर्षी राष्ट्रपतींची निवड होते?
उत्तर – स्विझरलँड
प्रश्न – कोणता जीव जन्मानंतर २ महिन्यापर्यंत झोपलेला असतो?
उत्तर – अस्वल
प्रश्न – कॅम्प्युटरला हिंदीत काय म्हणतात?
उत्तर – संगणक
प्रश्न – असा कोणता प्राणी आहे जो कधी पाणी पित नाही?
उत्तर – कंगारू, चहा