Interview Questions: कोणत्या प्राण्याचे हृदय त्याच्या डोक्यावर असते?; जाणून घ्या, योग्य उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 10:51 AM2022-03-14T10:51:25+5:302022-03-14T10:51:45+5:30
अशा देशाचं नाव सांगा, ज्याठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्ट पूर्णपणे मोफत आहे?, UPSC परीक्षेनंतर अनेक जण मुलाखतीत अयशस्वी ठरतात.
नवी दिल्ली – सरकारी नोकरीसाठी उमेदवारांना परीक्षेनंतर कठीण मुलाखतीतून जावं लागतं. यूपीएससी(UPSC) असो वा अन्य कुठलीही मुलाखत उमेदवारांना असे फिरवून प्रश्न विचारले जातात ज्यामुळे अनेकदा चांगला उमेदवारही गोंधळतो. अशावेळी उमेदवार सरळ प्रश्नाचेही चुकीचं उत्तर देतो. उमेदवारांचं जनरल नॉलेज तपासण्यासाठीही अनेक प्रश्न विचारले जातात. अशावेळी आम्ही तुम्हाला मुलाखतीत येणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं सांगत आहोत.
प्रश्न – भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
उत्तर – पहिले गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल होते
प्रश्न – अशी कोणती वस्तू आहे जी जळत नाही तसेच बुडत नाही?
उत्तर – बर्फ
प्रश्न – कोणत्या प्राण्याचे ह्दय त्याच्या डोक्यावर असतं?
उत्तर – समुद्री खेकडे
प्रश्न – आरंभिक वैदिक साहित्यात सर्वाधिकउल्लेखित नदी कोणती?
उत्तर – सिंधु नदी
प्रश्न – भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोणाला ओळखतात?
उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न – असा कोणता देश आहे ज्याठिकाणी सोने ATM मध्ये उपलब्ध आहे?
उत्तर – दुबई
प्रश्न – एका वर्षात किती मिनिट्सं असतात?
उत्तर – ५, २५, ६०० मिनिट्स
प्रश्न – अशा देशाचं नाव सांगा, ज्याठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्ट पूर्णपणे मोफत आहे?
उत्तर – लक्जमबर्ग
प्रश्न – आयपीचं फुल फॉर्म काय आहे?
उत्तर – इंटनेट प्रोटोकॉल
प्रश्न – अशा रेल्वे स्टेशनचं नाव सांगा, जे २ राज्यांमध्ये अर्ध-अर्ध विभागलं आहे?
उत्तर – महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवर असं एक रेल्वे स्टेशन आहे ज्याचं नाव नवापूर आहे. नवापूर रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्र आणि गुजरात या २ राज्यांमध्ये विभागलं आहे.
प्रश्न - गुलाब, झेंडू आणि सूर्यफुलामध्ये काय साम्य आहे?
उत्तर- तिन्ही फुले आहेत.
प्रश्न – विचार करा, तुम्ही एका जहाजात प्रवास करताय आणि ते बुडायला लागलं तर काय कराल?
उत्तर – मुख्य म्हणजे या प्रश्नातून मुलाखत घेणारा व्यक्ती उमेदवारांमधील हजरजबाबीपणा पाहतो. उमेदवार या प्रश्नावर उत्तर देतो की, मी विचार करणं बंद करेन
प्रश्न – असा कोणता देश आहे ज्याठिकाणी दरवर्षी राष्ट्रपती निवडला जाईल?
उत्तर – स्विझरलँड
प्रश्न - कोणता प्राणी कडुलिंबापेक्षा उंच उडी मारू शकतो?
उत्तर- कडुलिंबाच्या झाडावरून उडी मारणारा प्राणी नाही. वास्तविक, कडुलिंबाच्या झाडालाही उडी मारता येत नाही.