सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: ISRO मध्ये टेक्नीशियन, असिस्टंटसह अनेक पदांवर भरती;पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 05:29 PM2024-09-17T17:29:50+5:302024-09-17T17:30:46+5:30
ISRO Recruitment 2024 : 19 सप्टेंबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
ISRO Recruitment 2024 :सरकारीनोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने वैद्यकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, अभियंता यासह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इस्रोने याबाबत अधिकृत अधिसूचनाही जारी केली असून, अर्ज करण्याची प्रक्रिया 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 09 ऑक्टोबर 2024 आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ISRO ची ही भरती ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC) साठी केली जात आहे. ISRO मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी, त्यांचे स्वप्न साकार करण्याची ही एक चांगली संधी आहे. कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत? हे खाली पाहू शकता.शकतात.
- मेडिकल ऑफिसर SD 02
- मेडिकल ऑफिसर SC 01
- सायंटिस्ट/इंजीनिअर 10
- टेक्निकल असिस्टेंट 28
- सायंटिफिक असिस्टेंट 01
- टेक्नीशियन बी 43
- ड्रॉक्ट्समॅन-बी 13
- असिस्टेंट (राजभाषा) 05
- एकूण 103
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी/ITI/डिप्लोमा/ग्रॅज्युएशन/BE/ME/M. Tech/MBBS/MD उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार पात्रतेशी संबंधित इतर तपशील अधिकृत जाहिरातीतून तपासू शकतात. यासाठी ISRO HSFC Recruitment 2024 Official Notification PDF डाउनलोड करा.
वयो मर्यादा
ISRO च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पदानुसार किमान 18 वर्षे आणि कमाल 28-35 वर्षे असावे. मात्र, आरक्षित प्रवर्गांना यामध्ये नियमानुसार सूट देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2024 या आधारे उमेदवारांचे वय मोजले जाईल. या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना पद स्तर 3,4,7,10 आणि 11 नुसार वेतन दिले जाईल. ISRO लवकरच सविस्तर अधिसूचनेद्वारे फी, निवड प्रक्रिया आणि भरतीशी संबंधित इतर माहिती उपलब्ध करून देईल. भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.