JEE Advanced AAT 2022 चा निकाल आज जाहीर होणार; जाणून घ्या, अपेक्षित कट-ऑफ, सीट्स आणि स्कोअरकार्ड कसे तपासायचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 04:20 PM2022-09-17T16:20:21+5:302022-09-17T16:25:17+5:30

नवी दिल्ली - IIT बॉम्बे संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) एडवान्स आर्किटेक्चर अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (AAT) साठीचा निकाल आज अधिकृत वेबसाईट ...

JEE Advanced AAT Result 2022 To be Declared Today; Check Expected Cut-Off, Seat Distribution & How to Check Scorecard Here | JEE Advanced AAT 2022 चा निकाल आज जाहीर होणार; जाणून घ्या, अपेक्षित कट-ऑफ, सीट्स आणि स्कोअरकार्ड कसे तपासायचे?

JEE Advanced AAT 2022 चा निकाल आज जाहीर होणार; जाणून घ्या, अपेक्षित कट-ऑफ, सीट्स आणि स्कोअरकार्ड कसे तपासायचे?

googlenewsNext

नवी दिल्ली - IIT बॉम्बे संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) एडवान्स आर्किटेक्चर अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (AAT) साठीचा निकाल आज अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in वर जाहीर होणार आहे. विद्यार्थी रोल नंबर आणि जन्मतारीख टाकून निकाल पाहू शकतात. 

JEE Advanced AAT निकाल 2022 पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठीची लिंक फक्त अधिकृत वेबसाईटवर सक्रिय केली जाईल. वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल. जे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

IIT बॉम्बेने 14 सप्टेंबर 2022 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर सकाळी 9 ते 12 या वेळेत JEE Advanced AAT 2022 चे आयोजन केले होते. अंडरग्रेज्युएट आर्किटेक्चर प्रोग्राम्स (BArch) मध्ये प्रवेश घेण्यासाठी, उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. JEE Advanced AAT निकाल 2022 मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित, उमेदवारांची IIT बनारस हिंदू विद्यापीठ, IIT खरगपूर आणि IIT रुरकी येथे प्रवेश जागांसाठी निवड केली जाते. अपेक्षित कट-ऑफ, सीट डिस्ट्रीब्यूशन, काऊंसिलिंग प्रोसेस आणि निकाल ऑनलाईन कसा पाहायचा हे जाणून घ्या..

JEE Advanced AAT 2022 चा निकाल ऑनलाईन कसा पाहायचा?

14 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या JEE Advanced AAT 2022 परीक्षेला बसलेले विद्यार्थी खाली नमूद केलेल्या स्टेप्सनुसार निकाल पाहू शकतात. 

1. jeeadv.ac.in या JEE Advanced AAT 2022 च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. होमपेजवर असलेल्या JEE Advanced AAT Result 2022 लिंकवर क्लिक करा.
3. पुढच्या पानावर, तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आवश्यकतेनुसार इतर तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी एंटर वर क्लिक करा.
4. JEE Advanced AAT Result 2022 पुढील पानावर दिसेल.
5. तुमचा निकाल पाहा आणि तो डाऊनलोड करा.

गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, JEE AAT 2022 स्कोअरकार्डवर पुढील तपशील नमूद करणे अपेक्षित आहे - उमेदवाराचे नाव, रोल नंबर, नोंदणी क्रमांक, लिंग, स्वाक्षरी आणि फोटो, उमेदवारांचे गुण, पात्रता स्थिती आणि इतर वैयक्तिक तपशील.

जर विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आठवत नसेल, तर ते त्यांच्या संबंधित प्रवेशपत्रांद्वारे तपशील मिळवू शकतात. निकालाबाबत कोणत्याही शंका असल्यास, विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी परीक्षा प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर, संयुक्त जागा वाटप प्राधिकरण (JoSAA) JEE Advanced AAT 2022 साठी जागा वाटप आणि समुपदेशन प्रक्रिया सुरू करेल. समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत JEE वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने त्यांची नोंदणी करावी लागेल.

जागा वाटप प्रक्रियेदरम्यान, नोंदणीकृत उमेदवारांना त्यांची AAT 2022 रँक, श्रेणी आणि जागांची उपलब्धता यावर आधारित प्रवेशासाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. अर्जदारांना त्यांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि त्यांच्या प्रवेशाच्या जागांची पुष्टी करण्यासाठी संस्थेकडे अहवाल द्यावा लागेल. प्रवेश प्रक्रियेच्या अधिक तपशीलांसाठी, उमेदवारांना JEE Advanced AAT 2022 ची अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 

Web Title: JEE Advanced AAT Result 2022 To be Declared Today; Check Expected Cut-Off, Seat Distribution & How to Check Scorecard Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.