JEE Main exam :  'या' भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, परीक्षेची पुन्हा संधी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 09:56 PM2021-07-24T21:56:52+5:302021-07-24T22:08:28+5:30

JEE Main exam: पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

JEE Main exam: Students in some area of maharashtra will get great relief and will get another chance to take the exam | JEE Main exam :  'या' भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, परीक्षेची पुन्हा संधी मिळणार

JEE Main exam :  'या' भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, परीक्षेची पुन्हा संधी मिळणार

Next

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा काही भागांत बसला आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी दरड कोसळल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, या भागातील जेईई मेन २०२१ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपुढेही मोठे संकट उभे राहिले आहे. मात्र, आता या विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठा दिलासा दिला आहे. पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यासंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट केले आहे. "JEE Main परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २५ जुलै आणि २७ जुलै यादरम्यान आयोजित करण्यात आल्यात. मात्र कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि साताऱ्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. त्यांना पुन्हा संधी दिली जाईल आणि लवकरच नवी तारीख जाहीर केली जाईल", असे ट्विट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.

गेल्या रविवावारपासून राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडला. यावेळी पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि साताऱ्यात पावसाने धूमाकूळ घातला.यामुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २७,२८ आणि ३० एप्रिल २०२१ दरम्यान होणार होती. मात्र, देशातला कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. यंदाची परीक्षा चार टप्प्यांमध्ये नियोजित होती. त्यापैकी दोन टप्प्यांमधील परीक्षा पार पडली होती.

Web Title: JEE Main exam: Students in some area of maharashtra will get great relief and will get another chance to take the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.