JEE Mains Result 2023 : जेईई मेन्स २०२३ सत्र १ चा निकाल जाहीर; या ठिकाणी करा चेक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 02:28 AM2023-02-07T02:28:19+5:302023-02-07T02:30:10+5:30
जेईई मेनच्या पहिल्या सत्रासाठी एकूण ९ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यांपैकी सुमारे ८.६ लाख उमेदवारांनी पेपर-१ (बीई/बी.टेक) साठी, तर ०.४६ लाख उमेदवारांनी पेपर-2 (बी. आर्क/बी.प्लॅनिंग) साठी नोंदणी केली होती.
औरंगाबाद : देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन्स २०२३ सत्र १चा निकाल सोमवारी रात्री उशिरा जाहीर झाला. अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर, सोमवारी दिवसभर निकालाची प्रतीक्षा केली जात होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे जेईई मेन्स २०२३ च्या पहिल्या सत्राची परीक्षा जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली होती.
जेईई मेनच्या पहिल्या सत्रासाठी एकूण ९ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यांपैकी सुमारे ८.६ लाख उमेदवारांनी पेपर-१ (बीई/बी.टेक) साठी, तर ०.४६ लाख उमेदवारांनी पेपर-२ (बी. आर्क/बी.प्लॅनिंग) साठी नोंदणी केली होती. अंतिम उत्तर तालिका जाहीर झाल्यानंतर, निकालाची प्रतीक्षा होती. अखेर निकाल सोमवारी मध्यरात्री उशिरा जाहीर झाला. हा निकाल https://ntaresults.nic.in/resultservices/JEEMAIN-auth-23 या संकेतस्थळवर उमेदवारांना पाहता येईल.