नोंदी ठेवा... जेव्हा केव्हा शाळा उघडतील, तेव्हा तुम्हाला आजच्या अनुभवाचा उपयोग झाला पाहिजे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:45 AM2020-07-06T03:45:30+5:302020-07-06T03:46:07+5:30
पुन्हा शाळा उघडल्या की गोष्टी बदलतील, शिकवणं बदलेल, मुलांच्या शिकण्याची पद्धत बदलेल, मात्र तोवर अनेक मुलांना आणि शिक्षकांनाही या आॅनलाईनचीच सवय झालेली असेल.
ऑनलाईन शिक्षण अजून किती दिवस चालेल, कधी शाळा सुरूहोतील हे तर आज कुणीच सांगू शकत नाही; पण एक नक्की आहे की, शाळा कधी ना कधी तर सुरू होतीलच. कायमच काही आॅनलाईन शिकवावं लागणार नाही..
तेव्हाचाही जरा अंदाज घ्या. पुन्हा शाळा उघडल्या की गोष्टी बदलतील, शिकवणं बदलेल, मुलांच्या शिकण्याची पद्धत बदलेल, मात्र तोवर अनेक मुलांना आणि शिक्षकांनाही या आॅनलाईनचीच सवय झालेली असेल. वर्तन बदललेलं असेल, आकलनाची आणि समजावून सांगण्याची पद्धतही बदललेली असेल.
त्यावेळी दोन प्रश्न निर्माण होतील की, आॅनलाईन आपण काय शिकवलं, कसं शिकवलं, आता कशा रीतीने शिकवायचं आहे.
लॉकडाऊननंतर शाळा सुरू होतील, प्रत्यक्ष शिकणं, शिकवणं सुरू होईल, तेही दिवस सोपे नसतील. त्यामुळे तुम्ही आज काय शिकविता, याचं एक रेकॉर्ड ठेवा. नोंद ठेवा.
म्हणजे काय तर...
१. आता तुम्ही जे शिकवलं, त्यातलं हमखास जमलं, मुलांनाही मजा आली, उत्तम विषय समजला असं काय आहे, याची नोंद ठेवा.
२. काय अजिबात आॅनलाईन शिकविताना जमलं नाही, काय समजलं नाही, काय अवघड होतं, एकदम फ्लॉप शो झाला?- हेही नोंदवायला विसरू नका.
३. जर प्रत्यक्ष फेस टू फेस शिकवलं असतं तर यापैकी काय अधिक उत्तम जमलं असतं, तंत्राचा आधार घेऊन अधिक सोपं आणि मस्त झालं असतं, असं आता वाटलं, त्याची नोंद ठेवा.
४. आणि प्रत्यक्षापेक्षा आॅनलाईन शिकवितानाच काय उत्तम जमलं, ते प्रत्यक्षात शिकविताना नव्हतंच, याचीही नोंद ठेवा.
या साऱ्यातून तुमच्याकडे शाळा सुरू होताना एक होमवर्क तयार असेल. तेव्हा जे प्रश्न तयार होतील, त्याची उत्तरं तुम्हाला या अभ्यासातून सापडतील.
शाळा उघडतील, त्याची तयारीही आताच करून ठेवा..
(संदर्भ : ब्रिटिश कौन्सिल)