Indian Railways: रेल्वे प्लॅटफॉर्मवर का असतो पिवळ्या रंगाचा पट्टा? महत्वाचं आहे कारण, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 12:47 PM2022-12-04T12:47:35+5:302022-12-04T12:48:18+5:30

आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाता, तेव्हा तेथे रेल्वे लाईनला समांतर असलेला एक पिवळ्या रंगाचा पट्टा आपण पाहिला असेल. काही प्लॅटफॉर्मवर हा पिवळ्या रंगाचा पट्टा रंगाने तयार केलेला असतो, तर काही  रेल्वे प्लॅटफॉर्मवर हा पट्टा पिवळ्या रंगाच्या टाईल्स बसवून तयार केलेला असतो.

know about the fact of yellow line on railway platform indian | Indian Railways: रेल्वे प्लॅटफॉर्मवर का असतो पिवळ्या रंगाचा पट्टा? महत्वाचं आहे कारण, जाणून घ्या

Indian Railways: रेल्वे प्लॅटफॉर्मवर का असतो पिवळ्या रंगाचा पट्टा? महत्वाचं आहे कारण, जाणून घ्या

googlenewsNext

भारतीयरेल्वेला देशाची लाईफ लाईन असे म्हटले जाते. देशभरातील लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी, रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपायांचे पालन तर करतेच, शिवाय रेल्वे स्थानकावरही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध प्रकारचे संकेत वापरले जातात. तर जाणून घेऊयात, रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळ्या रंगाचा पट्टा का असतो? 

आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाता, तेव्हा तेथे रेल्वे लाईनला समांतर असलेला एक पिवळ्या रंगाचा पट्टा आपण पाहिला असेल. काही प्लॅटफॉर्मवर हा पिवळ्या रंगाचा पट्टा रंगाने तयार केलेला असतो, तर काही  रेल्वे प्लॅटफॉर्मवर हा पट्टा पिवळ्या रंगाच्या टाईल्स बसवून तयार केलेला असतो. महत्वाचे म्हणजे याचा पृष्ठभागही किंचितसा वर असतो.

खरे तर, जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर येणार असते, तेव्हा लोक ट्रेनमध्ये चढण्याच्या गडबडीत रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ जाऊन पोहोचतात. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळ्या रंगाचा पट्टा हा, ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचत असताना, आपण पिवळ्या पट्ट्याच्या मागे उभे रहायचे आहे, याचा संकेत आहे. महत्वाचे म्हणजे, जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोच असते, तेव्हा वेगवान वाऱ्याच्या दाबाने आपल्याकडे ओढू शकते. यामुळे प्रवाशांचा अपघात होऊ नये, म्हणून हा पिवळ्या रंगाचा पट्टा तयार केलेला असतो.

याच बरोबर, हा पिवळ्या रंगाच्या पट्ट्याचा पृष्ठभाग थोडा उचललेला असतो.. यामागचे कारण म्हणजे, एखादी दृष्टीहीन व्यक्ति प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर ट्रेन पकडण्याच्या नादात ती रेल्वे ट्रॅकवर पडू नये. दृष्टीहीन व्यक्तींसाठी हा पिवळ्या रंगाचा पट्टा अत्यंत उपयोगी ठरतो.

Web Title: know about the fact of yellow line on railway platform indian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.