कोटा येथील ॲलन इन्स्टिट्युटचा वेद लाहोटी जेईई ॲडव्हान्स परीक्षेत देशात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 02:14 PM2024-06-11T14:14:49+5:302024-06-11T14:20:41+5:30

Allen Career Institute, Kota: आयआयटी जेईईच्या इतिहासात वेद हा सर्वाधिक गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. त्याने ३६० गुणांपैकी ३५५ गुण मिळवत ९८.९१ टक्के मिळवले.

Kota Allen Student Ved Lahoti All India Topper in JEE-Advanced | कोटा येथील ॲलन इन्स्टिट्युटचा वेद लाहोटी जेईई ॲडव्हान्स परीक्षेत देशात पहिला

कोटा येथील ॲलन इन्स्टिट्युटचा वेद लाहोटी जेईई ॲडव्हान्स परीक्षेत देशात पहिला

>> वेद लाहोटीने मिळवले ९८.९१ टक्के गुण; ३६० गुणांपैकी ३५५ गुण मिळवत जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्या इतिहासातील सर्वाधिक गुण मिळवण्याचा बहुमान वेदच्या नावावर

>> ॲलनच्या द्विजा पटेल हिने मुलींमध्ये देशात पटकावला प्रथम क्रमांक

>> जेईई ॲडव्हान्स परीक्षेत देशातील टॉप १० मध्ये ॲलन इन्स्टिट्युटच्या ४ विद्यार्थ्यांचा समावेश असून टॉप १०० मध्ये संस्थेच्या तब्बल ४५ विद्यार्थ्यांचा समावेश

कोटा : जीईई ॲडव्हान्स परीक्षेत कोटा येथील ॲलन करिअर इन्स्टिट्युटने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आयआयटी मद्रासने जाहीर केलेल्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्या निकालात 'ॲलन'च्या वेद लाहोटी याने देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे. आयआयटी जेईईच्या इतिहासात वेद हा सर्वाधिक गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. त्याने ३६० गुणांपैकी ३५५ गुण मिळवत ९८.९१ टक्के मिळवले.

निकाल जाहीर होताच आयआयटी मद्रासच्या संचालकांनी वेद लाहोटी आणि द्विजा पटेल यांना बोलावून घेत परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्या निकालानंतर करिअर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. ॲलन करिअर इन्स्टिट्युटचे संचालक राजेश माहेश्वरी, नवीन माहेश्वरी आणि ब्रिजेश माहेश्वरी यांनी विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले.

'ॲलन'चे संचालक राजेश माहेश्वरी यांनी म्हटलं की, "जेईई ॲडव्हान्स परीक्षेत 'ॲलन'च्या ४ विद्यार्थ्यांनी देशात टॉप १० मध्ये आणि ४५ विद्यार्थ्यांनी टॉप १०० मध्ये समाविष्ट होण्यात यश मिळवलं आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. 'ॲलन'चा वेद लाहोटीने देशात प्रथम तर रिदम केडियाने चौथा, राजदीप मिश्रा याने सहावा, द्विजा पटेल हिने सातवा क्रमांक पटकावला आहे. द्विजा पटेल देशात मुलींमध्ये प्रथम आली आहे. यासोबतच देशात टॉप ५० मध्ये समाविष्ट असणारा राघव शर्मा हा १२ वा, शॉन थॉमस १५ वा, बिस्मित साहू १६ वा, शौर्य अग्रवाल २१ वा, नमिश २२ वा, अंश गर्ग २३ वा, मितांशू २६ वा, शेखर झा २८ वा, मोहम्मद सुफियान २९ वा, सागर व्ही. ३० वा, ईशान गुप्ता ३१ वा, ऋषित अग्रवाल ३५ वा, विदीप रेड्डी ३६ वा, अंशुल गोयल ३७ वा, अक्षर झाला ३८ वा, अर्णब ४० वा, आदिश्वर सिंह ४४ वा आणि अवैद ४९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तसंच देशात ६९ वा क्रमांक मिळवलेला अविक दास हा 'ॲलन'च्या लाईव्ह क्लासरूम प्रोग्रामचा विद्यार्थी आहे."

दरम्यान, "ॲलन करिअर इन्स्टिट्युट प्रायव्हेट लिमिटेडने यावेळी त्यांचे सर्व निकाल आंतरराष्ट्रीय ऑडिटर फर्म अर्नेस्ट अँड यंग (EY) द्वारे त्यांच्या मानकांनुसार तपासले आहेत. निकालांच्या सत्यतेसाठी 'ॲलन'चा हा एक अभिनव प्रयत्न आहे. निकाल प्रमाणित करणारी 'ॲलन' ही देशातील पहिली संस्था ठरली आहे," असंही राजेश माहेश्वरी यांनी सांगितलं आहे.

सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी ॲलन संस्था ओळखली जाते, असे संस्थेचे संचालक राजेश माहेश्वरी म्हणाले. उत्तम वातावरण, निपुण शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम निकाल हे संस्थेच्या गुणवत्तेची ग्वाही देते. २०१४ मध्ये संस्थेच्या चित्रांग मुरडिया आणि २०१६ मध्ये अमन बन्सल यांनी ऑल इंडिया रँक-१ मिळवला होता. 'ॲलन'ने आपल्याच विद्यार्थ्यांचा सर्वाधिक गुणांचा विक्रम मोडला आहे. 

"कोटा येथे अभ्यास करून 'आयआयटी'मध्ये सर्वाधिक गुण मिळवण्याचा माझा निर्धार होता" - वेद लाहोटी
इन्स्टिट्युट: ॲलन करिअर इंस्टिट्युट प्रायव्हेट लिमिटेड.
ऑल इंडिया रँक- १
वडील- योगेश लाहोटी
आई- जया लाहोटी

अशक्य असे काहीच नाही. आपण दृढनिश्चय केल्यास, सर्व काही शक्य आहे. जीवनात ध्येय असायला हवे आणि ते मोठे असले पाहिजे. यासोबतच कठोर परिश्रमांची जोड असेल आणि मेहनतीवर नेहमी विश्वास ठेवला पाहिजे. समोर लक्ष्य ठेवून जर तुम्ही मेहनत केली असेल तर यश नक्कीच मिळेल. शक्य तितका अधिक सराव करणे आवश्यक आहे, असा सल्ला जेईई ॲडव्हान्स-२०२४ परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या आणि ॲलन इन्स्टिट्युटचा विद्यार्थी असलेल्या वेद लाहोटीने दिला. वेदचा जेईई ॲडव्हान्सचा विक्रम मोडण्याचा निर्धार होता आणि त्याने तो पूर्ण केला. त्याने या परीक्षेत ३६० पैकी ३५५ गुण प्राप्त करत देशात पहिला क्रमांक तर पटकावलाच सोबत आतापर्यंत सर्वाधिक गुण प्राप्त करण्याचाही विक्रम केला आहे.

"कोटामध्ये शिकायचं हे लहानपणीच पक्कं केलं होतं"

वेदला कोटा येथे शिक्षण घ्यायचं होतं. वेदने सहावीत असताना ॲलन टॅलेंटेक्सची परीक्षा दिली आणि 'ॲलन'मध्ये प्रवेशही घेतला. त्याने कोटाबद्दल खूप ऐकलं होतं. वेदला येथे अभ्यास करण्याची खूप इच्छा होती आणि स्पर्धा लक्षात घेऊन त्याने ॲलन, कोटा येथे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याने जे ऐकले होते त्यापेक्षा त्याला कोटा अधिक चांगलं वाटलं. त्याला येथील वातावरण, सुविधा खूप वेगळ्या वाटल्या. आपलं ध्येय साध्य करण्यासाठीचा हा सर्वात मोठा निर्णय असल्याचं वेद मानतो. गेल्या सात वर्षांपासून तो ॲलन क्लासरूमचा विद्यार्थी आहे. JEE-Advanced वर आपलं लक्ष केंद्रीत करणाऱ्या वेदने अजून कोणत्या संस्थेत आणि शाखेत आपलं करिअर करायचं आहे हे ठरवलेलं नाही. त्याने दहावीमध्ये ९८.६ टक्के आणि बारावीमध्ये ९७.६ टक्के मिळवले. जेईई-मेन २०२४ मध्ये त्याने ३०० पैकी २९५ गुण मिळवत ऑल इंडिया रँक ११९ मिळवला आहे. प्रत्येक गोष्टीचं लॉजिकल उत्तर असण्यावर वेदचा विश्वास आहे. लहानपणी शाळेत कोणत्याही विषयात कमी गुण मिळाले तर मी आजोबांना शाळेत घेऊन जायचो आणि शिक्षकांना विचारायचो की मला कमी गुण का मिळाले? ही आवड अजूनही कायम आहे. JEE-Advanced मध्ये माझी दोन उत्तरं चुकली असंही त्याने म्हटलं आहे. वेदच्या कुटुंबात आजोबा आर सी सोमाणी हे सेवानिवृत्त इंजिनिअर आहेत. आई जया लाहोटी गृहिणी आहेत आणि वडील योगेश लाहोटी रिलायन्स जिओमध्ये कन्स्ट्रक्शन मॅनेजर आहेत. वेदचा आवडता विषय गणित आहे आणि त्याला प्रश्न सोडवायला खूप आवडतं. त्याला गणितातील प्रश्न सोडवणं आवडतं, म्हणूनच तो फिजिक्सच्या प्रश्नांना पूर्ण वेळ देतो. यानंतर तो इतर विषयांचा अभ्यास करतो. सध्या अभ्यासाचं कोणतंही निश्चित वेळापत्रक नाही. क्लासनुसार अभ्यासाचं वेळापत्रक ठरलेलं असतं. वेद ८ तास झोपण्याबाबत कधीही तडजोड करत नाही. तो त्याचं रुटीन नीट पूर्ण करण्याचा  प्रयत्न करतो. वेदला बुद्धिबळ आणि क्रिकेट खेळण्याची आवड आहे, पण त्याने शाळा किंवा जिल्हास्तरीय संघात कधीही भाग घेतला नाही. याशिवाय वाचन हा त्यांचा एकमेव छंद आहे. त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो काही ना काही वाचत राहतो. याशिवाय वेदला टीव्ही पाहणं किंवा चित्रपट पाहणं असा कोणताही छंद नाही.

आई आणि आजोबा प्रेरणास्थान

वेदसाठी त्याची आई जया लाहोटी आणि आजोबा आर. सी. सोमाणी हेच खरे प्रेरणास्थान आहेत. जेव्हा जेव्हा त्याला अडचणी येत, तेव्हा त्यांच्याशी बोलून आणि त्यांचं म्हणणं ऐकून तो पुढे जायचा. इंदूर या आपल्या मूळ गावी असताना वेद आपल्या आजोबांकडे राहत होता, तर कोटा येथे शिक्षण घेत असताना त्याच्या आईनं त्याला पूर्ण पाठिंबा दिला. परीक्षेच्या काळातही त्याची आई पूर्णपणे त्याच्यासोबत होती आणि त्याला प्रोत्साहन देत होती.

वेदची शैक्षणिक कारकीर्द

वेदला दहावीत ९८.६ टक्के तर बारावीत ९७.६ टक्के गुण मिळाले आहेत. जेईई-मेन २०२४ मध्ये त्याला ३०० पैकी २९५ गुण मिळवून ऑल इंडिया ११९ वा रँक मिळाला होता. वेद लाहोटी बालपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार आहे. इयत्ता पाचवी आणि सहावीत असताना आयएमओमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यानं दुसरा रँक मिळवला. इयत्ता आठवीत आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये त्यानं सुवर्णपदकही पटकावलं. याशिवाय आयआयटी कानपूरच्या टेकक्रिती २०२०-२१ मध्ये पहिला रँक मिळाला. याशिवाय अनेक ऑलिम्पियाडसाठी शिबिरं आणि अंतिम फेरीतही त्याची निवड झाली. इयत्ता सहावी ते दहावीच्या टॅलेंटेक्समध्ये अंतिम फेरीतही स्थानं मिळविलं. इयत्ता आठवीत असताना ॲलन चॅम्पमध्ये वेदनं ऑल इंडिया रँक ९ मिळवला होता.

"अडचणींना घाबरू नका, त्याचा सामना करा" - द्विजा

ऑल इंडिया गर्ल टॉपर
इन्स्टिट्युट : ॲलन करिअर इन्स्टिट्युट प्रा. लि.
वडील : धर्मेश पटेल
आई : किरण पटेल
JEE Advanced: AIR- 7
जन्मतारीख: 19 मे 2006

गेल्या दोन वर्षांपासून, ॲलन करिअर इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी द्विजा पटेलने JEE Advanced मध्ये ऑल इंडिया स्तरावर सातवा क्रमांक मिळवला आहे. द्विजाने मुलींच्या श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे. द्विजाने यापूर्वी JEE Main मध्ये ऑल इंडिया स्तरावर 58 वा क्रमांक मिळवला आहे आणि JEE Main जानेवारी सत्रात ऑल इंडिया स्तरावर अव्वल स्थान मिळवले आहे. याशिवाय द्विजाने दहावीत 99 टक्के आणि १२ वीमध्ये 95.5 टक्के गुण मिळवले आहेत. द्विजा म्हणाली की, JEE च्या तयारीसाठी दृढ आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला कमी गुण मिळतील पण तुम्ही निराश होऊ नका. अभ्यासात तुम्ही कुठे कमी पडता ते शोधून स्वत:ला कणखर बनवा. अडचणींना घाबरू नका, त्यांचा सामना करा. शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी नीट ऐका, त्याचे पालन करा, जेणेकरून तुम्हाला तयारीसाठी योग्य दिशा मिळेल. 'ॲलन'चे आभार, त्यांच्यामुळे आज माझे आयआयटीयन होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.

"गणित विषयातील प्रश्न सोडवणे हा माझा छंद आहे" - रिदम केडिया

संस्था: ॲलन करिअर इन्स्टिट्यूट
ऑल इंडिया रँक - 4
वडील: संजय केडिया, व्यावसायिक
आई: गरिमा केडिया, गृहिणी
जन्मतारीख: 12-02-2006

ॲलन क्लासरूमचा विद्यार्थी रिदम केडियाने JEE Advanced 2024 मध्ये AIR 4 चा मान पटकावला. रिदम केडियाने सांगितले की, 'अभ्यासाचे नियोजन असे असावे की तो वेळेवर पूर्ण होईल.' इतर गोष्टींमुळे होणारा विलंब टाळावा. मी दररोज अभ्यास करत होतो आणि उजळणीवर भर देत होतो. यामुळे मला खूप विश्वास वाटला. गाणी ऐकणे, कविता लिहिणे आणि गणिताचे प्रश्न सोडवणे हे माझे छंद आहेत. मी अभ्यासासाठी प्रत्येक विषयाचा आराखडा तयार ठेवत होतो. ॲलनमधील मॉक टेस्टने खूप मदत केली. त्यामुळेच JEE Advanced परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची हे समजू शकले. अभ्यासाच्या पद्धतीबद्दल बोलताना त्याने सांगितले की त्याने रसायनशास्त्राचा अभ्यास करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले, कारण त्याला वाचलेलं विसरण्याची सवय आहे. त्याने सांगितले की जेईई ॲडव्हान्स 2024 मध्ये यश मिळवण्यासाठी त्याने भौतिकशास्त्राची समीकरणे आणि गणिताचा सराव केला. मी स्मार्टफोन वापरतो, पण सोशल मीडियावर सक्रिय नाही. मनोरंजनासाठी मी स्मार्टफोनवर यूट्यूब पाहायचो. जेव्हा क्लासेस असायचे तेव्हा रोज ५-६ तास सेल्फ स्टडी करत असे आणि जेव्हा क्लास नसायचे तेव्हा जवळपास १० तास सेल्फ स्टडी करत असे. JEE ची तयारी करताना मी सात तास झोपत होतो. माझ्या यशाचे श्रेय मी शिक्षक आणि पालकांना देतो. "जेव्हा मला परीक्षेत कमी गुण मिळायचे, तेव्हा माझे पालक मला प्रेरित करायचे, जे खूप उपयुक्त ठरले." शिक्षकांनी मला फक्त शिकवलेच नाही तर मार्गदर्शनही केले. आता मला आयआयटी मुंबईमध्ये कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास करायचा आहे. यानंतर, मला एक स्टार्ट-अप चालवायचा आहे. मी JEE Main 2024 मध्ये 295 गुणांसह AIR 121 मिळवले. रिदमने यावर्षी बारावीमध्ये 97.8 टक्के गुण मिळवले आहेत. तो अकरावीपासून 'ॲलन' येथे शिकत आहे. रिदमने अकरावीत असताना इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड (IPhO) मध्ये रौप्यपदक जिंकले होते. यावर्षी तो IphO मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

"शिक्षणासाठी कोटाशिवाय दुसरा चांगला पर्यायच नाही" - राजदीप 

वडील- राजेश मिश्रा, भारतीय वायुसेना
आई- नमिता मिश्रा, गृहिणी
JEE Advanced - AIR-06
जन्मतारीख - 11 जानेवारी 2007

गेल्या दोन वर्षांपासून राजदीप मिश्रा हा ॲलन करिअर इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आहे. राजदीपने जेईई ॲडव्हान्समध्ये संपूर्ण देशभरातून सहावा रँक मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याने त्याचं सगळं श्रेय त्याच्या इन्स्टिट्यूट आणि शिक्षकांना दिलं आहे. "मी माझ्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर जेईईची तयारी सुरू केली. या तयारीसाठी मी माझं शेड्युल तयार केलं होतं आणि या वेळापत्रकाचं मी काटेकोरपणे पालन केलं. माझ्या यशाचं श्रेय म्हणजे फक्त माझ्या शिक्षकांचं आहे. कारण, मी माझ्या शिक्षकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन केलं आणि त्यानुसारच वागत आलो. 'ॲलन'मध्ये शिकवणारा प्रत्येक शिक्षक अनुभवी असून बदल्यात पॅटर्ननुसार परीक्षांची तयारी कशी करून घ्यायची, हे त्यांना माहीत आहे," असं राजदीप म्हणाला.

पुढे तो म्हणतो,  "ॲलनमध्ये असलेले मॉड्यूलची सुद्धा खूप मदत झाली. ते परफेक्ट असून जे विद्यार्थी पुढच्या वर्षी जेईईची तयारी करत आहेत, त्यांनी आपले शंभर टक्के प्रयत्न करावे इतकं मी त्यांना सांगू इच्छितो. मला सुरुवातीपासूनच आयआयटीयन व्हायचं होतं आणि 'ॲलन'मुळे माझं स्वप्न साकार झालं."

राजदीप मूळचा जामनगर, गुजरात येथील असून त्याचे वडील राजेश मिश्रा हवाई दलात आहेत. तर, आई निमिता गृहिणी आहे. यापूर्वी जेईई मेन्समध्येही राजदीपनं ९९.९९ टक्के गुण मिळवत AIR ९५ पटकावला होता. त्याला दहावीत ९८.६ टक्के आणि बारावी ९८.८ टक्के गुण मिळाले होते. याशिवाय त्यानं आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड (आयजेएसओ) २०२१ युएई आणि आयजेएसओ २०२२ कोलंबियामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदकही पटकावलं आहे.

"यशाला कोणताच शॉर्टकट नसतो" - राघव शर्मा

वडिलांचे नाव - कृष्णमोहन शर्मा, व्यावसायिक
आईचे नाव - सीमा शर्मा
JEE Advanced Rank: AIR 12
इन्स्टिट्युट : ॲलन करिअर इन्स्टिट्युट प्रा. लि.

कोटा येथील ॲलन इन्स्टिट्युटचा विद्यार्थी राघव शर्माने जेईई ॲडव्हान्समध्ये देशात १२ वा क्रमांक पटकावला आहे. राघव हा राजस्थानमधील झलवारचा रहिवासी आहे. सहावीपासून तो ॲलन इन्स्टिस्ट्यूटचा नियमित विद्यार्थी आहे. याआधी राघवने बारावीत 96.6 टक्के मिळवले.  तर जेईई मेन्समध्ये देशात ७४ वा क्रमांक पटकावला. राघव म्हणाला, "कोटाच्या ॲलन इन्स्टिट्युट येथील वातावरण अभ्यासाला अत्यंत पोषक आहे. विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या दृष्टीने इथे सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या जातात. संस्थेतील अभ्यासपूर्ण वातावरण मुलांना त्यांच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. मला नियमित अभ्यासामुळेच हे यश मिळाले. यशासाठी मेहनत घेणे गरजेचे असते. कारण इथे कोणताच शॉर्टकट नसतो. मी दररोज सकाळी योग आणि  व्यायाम देखील करायचो. क्लासमधील अभ्यासाशिवाय मी घरी १० तास रोज अभ्यास करायचो. यात मधे विश्रांती घ्यायचो. क्लासमध्ये काय शिकवलं आहे ते मी दररोज घरी आल्यावर पुन्हा वाचायचो. मी सगळ्या मॉक टेस्टही दिल्या. आता आयआयटी मुंबई  (IIT Mumbai) येथून CS ब्रांचमध्ये B.tech करायचं माझं स्वप्न आहे जे पूर्ण होताना दिसत आहे."


"नियमित अभ्यास आणि उजळणी केल्यास यश नक्कीच मिळेल" - शेखर झा 

शेखर झा, मधुबनी(बिहार) 
वडील : श्यामंत झा, बँक मॅनेजर
आई : अल्पना झा, शिक्षिका
जन्मतारीख : १६ जानेवारी २००७
JEE Advanced AIR – 28

जेईई ॲडव्हान्समध्ये देशात २८ वा रँक मिळवणारा शेखर झा गेल्या दोन वर्षांपासून ॲलन इन्स्टिट्युटचा विद्यार्थी आहे. त्याने जेईई मेनमध्ये ८११ रँक मिळवला होता. १२वीच्या परीक्षेत त्याला ९७ टक्के गुण मिळाले आहेत. जेईईमध्ये घवघवीत यश मिळवलेला शेखर म्हणतो की, नियमित अभ्यास आणि उजळणी हीच यशाची गुरुकिल्ली आहे. यामुळे कोणत्या विषयात तुम्हाला अधिक मेहनत घ्यायची गरज आहे ते कळतं. यामुळे तुम्हाला प्रश्न पडतात. त्या शंकांचं निरसन झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि यासाठी उत्तम संस्थेची गरज असते. मी जास्तीस जास्त मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न केला. यामुळे मला वेळेचं गणित समजलं आणि त्याबरोबरच अचूकताही वाढली. मॉक टेस्टमुळे जेईई ॲडव्हान्स परीक्षेबद्दलची माझ्या मनात असलेली भीती कमी झाली. त्यामुळे जेईई ॲडव्हान्सची परीक्षा मी बिनधास्त देऊ शकलो. मी ऑनलाइन व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करायचो. पण, सोशल मीडियापासून मी स्वत:ला दूर ठेवलं होतं. माझे वडील श्यामंत झा हवाई दलात काम करत होते. निवृत्तीनंतर आता ते बँकेत मॅनेजर आहेत. मला आयआयटी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्स विषयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घ्यायचे आहे. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर मला फिजिक्समध्ये रिसर्च करायचा आहे.

"अभ्यास किती वेळ केला, त्यापेक्षा तो दर्जात्मक, उपयोगाचा असणं महत्त्वाचं" - ईशान गुप्ता 

वडील : अरविंद कुमार, कंपनी सेक्रेटरी
आई : मीनाक्षी गुप्ता, कंपनी सेक्रेटरी
जन्मतारीख : २७ सप्टेंबर २००६
JEE Advanced AIR – 31

ॲलन इन्स्टिट्युटचा विद्यार्थी ईशान गुप्ता याने जेईई ॲडव्हान्स परीक्षेत देशात ३१ वा रँक मिळवला आहे. जेईई मेन परीक्षेत १०० टक्के मिळवून त्याने देशात ४६वा रँक मिळवला होता. याशिवाय १०वी आणि १२वी परीक्षेत त्याने ९८ टक्के गुण मिळवले आहेत. मी रोज ८-१० तास अभ्यास करायचो, असं ईशान सांगतो. याशिवाय मी नियमित गृहपाठही करायचो. यामुळे उजळणी होते आणि शंकाही उपस्थित होतात. तुमच्या शंकाचं जास्तीत जास्त निरसन झालं तर तुमचा तो विषय पक्का होतो. मी रोज सहा तास सेल्फ स्टडी करायचो. जर अभ्यासातून काहीच मिळणार नसेल, तर रोज १२-१४ तास अभ्यास करणं उपयोगाचं नाही, असं मला वाटतं. तुम्ही भले रोज दोन तास अभ्यास करा, पण तो दर्जात्मक असला पाहिजे. मी सकाळी लवकर उठायचो. क्लासला जाण्याआधी रोज एक तास अभ्यास करायचो. मी नियमित थोडासा व्यायाम करायचो आणि चालायला जायचो. ॲलन इन्स्टिट्युटमधील शिक्षकांवर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता. करमणुकीसाठी मी बुद्धिबळ खेळायचो. आयआयटी मुंबई येथून कॉम्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर मला डेटा सायन्स आणि थिरोटिकल फिजिक्समध्ये रिसर्च करायचं आहे.

"मला अभ्यास करायला आवडतं, हा माझ्या यशाचा मंत्र" - ऋषित अग्रवाल
सॉफ्टवेअर इंजिनिअर आईने आपली नोकरी सोडली आणि वडिलांनी वर्क फॉर्म होम करत ऋषितला दिली साथ

वडील - गोपाळ अग्रवाल, सीए
आई - शैली अग्रवाल, सॉफ्टवेअर इंजिनीअर
जेईई ॲडव्हान्स एआयआर - ३५
इन्स्टिट्युट - ॲलन करिअर इन्स्टिट्युट प्रायव्हेट लिमिटेड
जन्म तारीख - २२ जून २००६

ॲलन इन्स्टिट्युटमधील विद्यार्थी ऋषित अग्रवालने जेईई ॲडव्हान्समध्ये ऑल इंडिया रँक ३५ मिळवला आहे. यादरम्यान, जेईईसारख्या स्टँडर्ड आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची तयारी करण्यासाठी कोटा आणि 'ॲलन'पेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. या ठिकाणी विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले जातात, असे ऋषितने सांगितले.  जे विद्यार्थी पुढील वर्षी जेईई परीक्षा देणार आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, त्यांनी तिन्ही विषयांसाठी समान वेळ द्यावा आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. जर तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळत असतील तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. जुन्या चुका लक्षात घेऊन पुढील परीक्षेत सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करावा, असे ऋषित म्हणाला. दरम्यान, ऋषितचे कुटुंब हे फरीदाबाद येथे राहते. या ठिकाणी ऋषितचे वडील गोपाळ अग्रवाल हे एका खासगी कंपनीत सीए आहेत. आई शैली या सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ज्यावेळी ऋषितच्या स्टडीसाठी त्यांच्यावर कोटाला जाण्याची वेळ आली, तेव्हा ऋषितच्या आईने आपली नोकरी सोडली आणि त्याच्या वडिलांनी कंपनीतून वर्क फॉर्म होम घेतले आणि संपूर्ण कुटुंबासह कोटा येथे शिफ्ट झाले.

पुढे ऋषितने सांगितले की, अभ्यासादरम्यान पालक मुलांसोबत असतील तर मुलांना खूप भावनिक आधार मिळतो. कोटामध्ये आल्यानंतर आम्हाला कधीच त्रास झाला नाही, असे वाटले नाही. अभ्यासाचे जे वातावरण इथे मिळालं, ते इतरत्र कुठेही नाही. या शहरात मुलांचीही चांगली काळजी घेतली जाते. मी जेईईची तयारी केली आणि नेहमी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला, निकालाची कधीही चिंता केली नाही. याचबरोबर, मला अभ्यास करायला नेहमीच आवडतं आणि हाच माझा यशाचा मंत्र आहे. मी जेईई मेन्समध्ये ९९.९९७ पर्सेंटाइल मिळविले आहेत आणि ऑल इंडिया रँक ११८ मिळविला आहे. तसेच, मी दहावीत ९७.४ टक्के गुण मिळविले आहेत. तर बारावीच्या परीक्षेत ९८.२ टक्के गुणांसह उत्तीर्ण झालो आहे. याशिवाय, एक करमणूक म्हणून मी बॅडमिंटन खेळत होतो, असे ऋषितने सांगितले.

Web Title: Kota Allen Student Ved Lahoti All India Topper in JEE-Advanced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.