अकरावी प्रवेशाची परीक्षा हायकोर्टानं केली रद्द, आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी काढला नवा मार्ग; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 05:03 PM2021-08-10T17:03:26+5:302021-08-10T17:04:10+5:30

मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला दणका देत इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची २१ ऑगस्ट २०२१ रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे.

Maharashtra FYJC CET exam cancelled by Bombay High Court education minister varsha gaikwad replay on HC | अकरावी प्रवेशाची परीक्षा हायकोर्टानं केली रद्द, आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी काढला नवा मार्ग; म्हणाल्या...

अकरावी प्रवेशाची परीक्षा हायकोर्टानं केली रद्द, आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी काढला नवा मार्ग; म्हणाल्या...

Next

मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला दणका देत इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची २१ ऑगस्ट २०२१ रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारनं यावेळी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षा न घेता नव्या निषकांनुसार निकाल जाहीर केला होता. त्यानंतर इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात २८ मे रोजी एक अध्यादेश काढला होता. सरकारचा हा अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. 

विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच इयत्ता अकरावीसाठीचे प्रवेश द्यावेत, असे निर्देश कोर्टानं दिले आहेत. कोर्टाच्या निकालावर आता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

"न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून त्यानंतर अंतर्गत गुणांच्या निकालाच्या आधारावर प्रवेशक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल, तसेच त्याचे नियोजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणीही केली होती, तर काहींनी अभ्यासही सुरू केला होता. राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कोर्टाच्या निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदा ही अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येईल आणि प्रत्येकाला प्रवेश मिळेल", असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. 

४८ तासांत विद्यार्थ्यांना माहिती द्या
राज्य सरकारनं ४८ तासांत निकालाची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असंही निर्देश कोर्टानं दिले आहेत. तसेच पुढील सहा आठवड्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधीच्या सुनावणीत राज्य सरकारकडून आशुतोष कुंभकोणी यांनी सीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकारची बाजू मांडली होती. 

Read in English

Web Title: Maharashtra FYJC CET exam cancelled by Bombay High Court education minister varsha gaikwad replay on HC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.