Maharashtra HSC 12th Result 2022: कोकण विभाग अव्वल! राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२ टक्के; मुंबई विभागाची निराशा, मुलींची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 11:20 AM2022-06-08T11:20:06+5:302022-06-08T11:31:49+5:30

Maharashtra HSC 12th Result 2022, MSBSHSE Board HSC 12th Result 2022: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्यात एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

maharashtra hsc msbshse 12th result 2022 today live update check marks maharesult nic in | Maharashtra HSC 12th Result 2022: कोकण विभाग अव्वल! राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२ टक्के; मुंबई विभागाची निराशा, मुलींची बाजी

Maharashtra HSC 12th Result 2022: कोकण विभाग अव्वल! राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२ टक्के; मुंबई विभागाची निराशा, मुलींची बाजी

googlenewsNext

Maharashtra HSC 12th Result 2022, MSBSHSE Board HSC 12th Result 2022: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्यात एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दरवर्षी प्रमाणे यंदाची कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक ९७.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला असून ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकाल दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाइन पद्धतीनं पाहता येणार आहे. 

राज्याच्या बारावीच्या बोर्डाची पत्रकार परिषद आज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. राज्यात यंदा बारावीची परीक्षा कशी घेण्यात आली आणि किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? तसंच सरासरी निकाल किती लागला याची सविस्तर माहिती देण्यात आली. यंदा ७५ टक्के लेखी अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तर किमान ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली होती. तसंच तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रकल्प यासाठी दोन कालावधी देण्यात आले होते. तसंच ७० ते १०० गुणांच्या प्रश्न पत्रिकांसाठी यंदा ३० मिनिटं जादा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. तर ४० ते ६० गुणांच्या प्रश्न पत्रिकांसाठी १५ मिनिटं जादा वेळ देण्यात आला होता. शाळा तिथं परीक्षा केंद्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं. बारावीच्या निकाल यंदाही मुलींनी बाजी मारली असून ९५.३५ टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ९३.२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे...
कोकण- ९७.२१ टक्के
पुणे- ९३.६१ टक्के
नागपूर- ९६.५२ टक्के 
औरंगाबाद- ९४.९७ टक्के
मुंबई- ९०.९१ टक्के 
कोल्हापूर-  ९५.०७ टक्के 
अमरावती- ९६.३४ टक्के
नाशिक- ९५.०३ टक्के 
लातूर- ९५.२५ टक्के  

गेल्या वर्षी कोरोना परिस्थितीमुळे परीक्षा होऊ शकल्या नव्हता. तर यंदा दहावीच्या परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरू झाल्या होत्या. तर ४ एप्रिल २०२२ रोजी संपल्या होत्या. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी आणि ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. 

कुठे पाहता येईल निकाल?
विद्यार्थी आणि पालकांना maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येईल, त्याची प्रतही (पिंट्र आऊट ) घेता येईल. दुपारी १ वाजता या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध होणार आहे. 

गुणपत्रिका कधी मिळणार?
विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातर्फे १७ जूनला गुणपत्रिका दिल्या जातील.

Web Title: maharashtra hsc msbshse 12th result 2022 today live update check marks maharesult nic in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.