दहावीची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन करा, मराठी शाळा संस्थाचालक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 07:28 AM2021-05-25T07:28:55+5:302021-05-25T07:29:56+5:30

SSC Exam Update: दहावीची परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निणय कायम ठेवावा, अशी भूमिका मराठी अभ्यास केंद्र संलग्न मराठी शाळा संस्थाचालक संघाने मांडली आहे.

Make an internal assessment without taking the matriculation examination, the demand of the Marathi School Institutional Association through a letter to the Minister of Education | दहावीची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन करा, मराठी शाळा संस्थाचालक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

दहावीची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन करा, मराठी शाळा संस्थाचालक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

Next

मुंबई : राज्यात व देशात दहावी, बारावीच्या टप्प्यावरील परीक्षांबाबत गोंधळ सुरू आहे. पालक, हायकोर्ट,  सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय शिक्षण विभाग यांच्यात याबाबत ऊहापोड सुरू आहे. पण, दहावीची परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निणय कायम ठेवावा, अशी भूमिका मराठी अभ्यास केंद्र संलग्न मराठी शाळा संस्थाचालक संघाने मांडली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना त्यांनी काही पर्यायही सुचविले आहेत.

दहावी परीक्षांचा निर्णय  न्यायप्रविष्ट असल्याने अंतिम निर्णयास दिरंगाई होणार आहे. आता विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व वेळेवर सुरू कराव्या लागणारे शैक्षणिक वर्षाचा प्रश्न उभा आहे. मूल्यमापनाचे स्वरूप, अभ्यासक्रम काय असेल? पुन्हा परीक्षा वा आणखी वेग‌ळ्या मूल्यमापनाला सामोरे जायची मानसिक तयारी पालक व मुलांची आहे का, असे असंख्य प्रश्न आहेत. कोरोनामुळे सर्वच व्यवस्था कोलमडलेली असताना, सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचलेले नसताना त्यांना गुणांच्या निकषावर अनुत्तीर्ण करणे चुकीचे ठरेल, असे मत संस्थाचालक संघाने मांडले आहे, तर अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला व पुढील शैक्षणिक वर्षाला लेटमार्क लागणार जे शैक्षणिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीच, अशी मते संघातील जाणकार अभ्यासकांनी मांडली आहेत.  त्यामुळे शाळास्तरावर मूल्यमापन घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाकडून करण्यात आली आहे. 

नववीच्या निकालाचाही आधार घेतला जावा
पुणे : दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीतील अंतर्गत परीक्षा व इयत्ता नववीतील निकालाचासुद्धा आधार घ्यावा, असा प्रस्ताव मुख्याध्यापक संघाने शिक्षण विभागाकडे सादर केला आहे, अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी ‘लोकमत’ला दिली. 

संस्थाचालक संघाचे ठळक मुद्दे
शाळास्तरावर मूल्यमापनानंतर कनिष्ठ महाविद्यालये असलेल्या महाविद्यालयात विद्यार्थी सहज प्रवेश घेऊ शकतील. शिवाय ज्या उच्च माध्यमिक शाळांत सुविधा आहेत तिथे हंगामी अकरावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली तरी हा प्रश्न सुटू शकेल.
डिप्लोमा, आयटीआय आदी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी शाखानिहाय प्रवेश परीक्षेची व्यवस्थाही विद्यार्थ्यांसाठी करता येईल, असे मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजूळ यांनी सांगितले. 

 

Web Title: Make an internal assessment without taking the matriculation examination, the demand of the Marathi School Institutional Association through a letter to the Minister of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.