भारतीय पोस्ट विभागात 21000 पदांची मेगाभरती; पात्रता फक्त 10वी पास, जाणून घ्या तपशील...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 20:00 IST2025-02-18T20:00:01+5:302025-02-18T20:00:44+5:30
GDS 2025 Notification: पात्र उमेदवारांची परीक्षेशिवाय थेट नियुक्ती केली जाईल.

भारतीय पोस्ट विभागात 21000 पदांची मेगाभरती; पात्रता फक्त 10वी पास, जाणून घ्या तपशील...
India Post Recruitment 2025 : तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारीनोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. कुठल्याही परीक्षेशिवाय भारतीय टपाल विभागात (इंडिया पोस्ट) ग्रामीण डाक सेवक पदावर भरती होत आहे. या भरतीद्वारे 21 हजाराहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. पात्र उमेदार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज भरू शकता.
रिक्त जागांचा तपशील
या भरती मोहिमेद्वारे भारतीय पोस्ट विभागात एकूण 21,413 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवकांच्या पदांचा समावेश आहे. येथेक्लिककरुन पाहा तपशील...
3 मार्चपर्यंत अर्ज भरा
इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक भर्ती (इंडिया पोस्ट GDS) 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट https://indiapostgdsonline.gov.in/ ला भेट देऊन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 मार्च 2025 आहे, त्यानंतर उमेदवारांना 6 मार्च ते 8 मार्च 2025 या कालावधीत अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी दिली जाईल.
पात्रता
इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक/10वी परीक्षा (गणित आणि इंग्रजी विषयांसह) उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराने ज्या क्षेत्रातून अर्ज केला आहे, त्या भागातील स्थानिक भाषेत 10 वी पर्यंतचा अभ्यास केलेला असावा. पोस्टनिहाय स्थानिक भाषेचे तपशील अधिसूचनेत पाहिले जाऊ शकतात. डाक सेवक पदासाठी संगणकाचे चांगले ज्ञान आवश्यक आहे.
परीक्षेशिवाय मिळेल नोकरी ?
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पात्र अर्जदारांची निवड सिस्टीम जनरेट केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. ही गुणवत्ता यादी 10 वी मध्ये मिळालेल्या गुण किंवा ग्रेड गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
वयोमर्यादा
इंडिया पोस्ट GDS पोस्टसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे. पण, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात कमाल सूट दिली जाईल. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे, अपंग (PwD) साठी 10 वर्षे, PwD+OBC साठी 13 वर्षे आणि PwD+SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 15 वर्षे सूट देण्यात आली आहे.
पगार
या भरतीद्वारे ABPM/GDS (ग्रामीण डाक सेवक) आणि BPM ची वेतनश्रेणी वेगळी आहे. बीपीएम पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 12,000 रुपये ते 29,380 रुपये (प्रति महिना) पगार मिळेल. तर, ABPM/डाक सेवक पदांवर निवडलेल्या उमेदवारांना रु. 10,000 ते रु. 24,470 (प्रति महिना) पगार मिळेल.
अर्ज फी
यासाठी अर्ज करणाऱ्या सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. महिला उमेदवार, SC/ST अर्जदार, PWD अर्जदार आणि Transwomen अर्जदारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. सूट मिळालेल्या श्रेणीतील अर्जदार वगळता, अर्जदार पेमेंटसाठी लिंकचा वापर करून कोणत्याही ऑनलाइन पेमेंट पद्धतीद्वारे फी भरू शकतात. यासाठी क्रेडिट/डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग सुविधा/UPI वापरता येईल.