मोठी बातमी! UPSC पाठोपाठ MPSC चाही निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यातून प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 06:32 PM2022-05-31T18:32:44+5:302022-05-31T18:34:18+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेचाही निकाल जाहीर झाला आहे.

MPSC Final Result Published Pramod Chowgule first from the state | मोठी बातमी! UPSC पाठोपाठ MPSC चाही निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यातून प्रथम

मोठी बातमी! UPSC पाठोपाठ MPSC चाही निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यातून प्रथम

Next

मुंबई-

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेचाही निकाल जाहीर झाला आहे. एमपीएससीच्या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. एकूण दोनशे पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येणार आहे. (State Service (Main) Exam Final Result Published)


राज्यात ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२० घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. प्रमोद बाळासो चौगुले हा राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून पहिला आला आहे. तर रूपाली गणपत माने या महिलांमधून तर गिरीश विजयकुमार परेकर हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे.

एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीचाही (MPSC Civil Engineering) निकाल आजच जाहीर करण्यात आला आहे. एकूण ६५२ पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात रोहित कट्टे स्थापत्य अभियांत्रिकीत राज्यात प्रथम आला आहे. एमपीएससीकडून निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.

Web Title: MPSC Final Result Published Pramod Chowgule first from the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.