CUCET 2022 Notification: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! मार्कांची गरज नाही; प्रवेश परीक्षेवरच कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:57 AM2022-03-22T10:57:09+5:302022-03-22T11:29:26+5:30
CUCET 2022 Notification by UGC: विद्यापीठात प्रवेशासाठी जास्त टक्के मिळविण्याचा ताण विद्यार्थ्यांवर असायचा, मात्र आता नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CUET) जाहीर केली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही परीक्षा १३ भाषांमध्ये होणार असल्याची माहिती यूजीसीने दिली आहे.
दिल्ली विद्यापीठ, जेएनयू आणि जामियासह सर्व केंद्रीय विद्यापीठांना पुढील शैक्षणिक वर्षापासून CUET च्या आधारावर प्रवेश घ्यावा लागेल. ही परीक्षा हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, आसामी, बंगाली, पंजाबी, उडिया आणि इंग्रजी भाषेत घेतली जाईल. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतली जाईल.
अधिक माहिती nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. सीईटी परीक्षेचे अर्ज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. राज्य किंवा खाजगी डीम्ड विद्यापीठे देखील या परीक्षेमध्ये भाग घेऊ शकतात. मोठ्या संख्येने केंद्रीय विद्यापीठांनी CUET 2022 मध्ये त्यांचा सहभाग नोंदविला आहे. त्याची माहिती लवकरच nta.ac.in वर प्रसिद्ध केली जाईल.
Common University Entrance Test (CUET) for admission in UG programs from the academic session 2022-2023 in all UGC funded Central Universities will be conducted in 13 languages including English, Hindi, Marathi, Gujarati, Tamil, Telugu and Kannada: UGC pic.twitter.com/8VqgwFBq3h
— ANI (@ANI) March 22, 2022
काय होणार फायदा...
विद्यापीठात प्रवेशासाठी जास्त टक्के मिळविण्याचा ताण विद्यार्थ्यांवर असायचा, मात्र आता नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. आता सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बोर्डाच्या परीक्षेत म्हणजेच १२वीमध्ये मिळालेल्या गुणांना कोणतेही महत्त्व दिले जाणार नाही. आता केंद्रीय विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवीपूर्व प्रवेशांसाठी, पात्रता निकषांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर १२वीच्या गुणांचा कोणताही परिणाम होणार नाही. हे नियम शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून सुरू होतील.