आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 06:21 AM2024-05-25T06:21:20+5:302024-05-25T06:22:29+5:30

अकरावी आणि बारावीला  दाेन  भाषा, चार वैकल्पिक विषय आणि दाेन अनिवार्य विषय असे एकूण आठ विषय असणार आहेत.

Now English is not compulsory in 10th, 12th; Any two Indian languages can be chosen | आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार

प्रतिकात्मक फोटो...

पुणे :  राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणांतर्गत इयत्ता अकरावी आणि बारावी वर्गाकरिता दाेन भाषा विषयांसह एकूण आठ विषय घेता येणार आहेत. नवीन बदलानुसार सध्या अनिवार्य असलेल्या इंग्रजी विषयाची सक्ती नसेल, तसेच काेणत्याही दाेन भारतीय भाषा निवडण्याची संधी दिली जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) मसुद्यात याचा उल्लेख आहे. 

अकरावी आणि बारावीला  दाेन  भाषा, चार वैकल्पिक विषय आणि दाेन अनिवार्य विषय असे एकूण आठ विषय असणार आहेत. विद्यार्थ्यांना काेणत्याही दाेन भाषा निवडण्याची मुभा असेल. दाेन भाषांव्यतिरिक्त एक अधिकची भाषा वैकल्पिक विषय म्हणून निवडायची संधी  असेल. वैकल्पिक भाषा निवडताना कला, विज्ञान, वाणिज्य अशा शाखांमधील साचेबद्ध बंधन नसेल. ‘गट एक’मध्ये २६ भाषांमधून दाेन विषय निवडावे लागतील.  

अशी करा दाेन भाषा विषयांची निवड 
- दाेन भाषांपैकी किमान एक भाषा मूळ भारतीय भाषा असावी. या निवडलेल्या भाषेव्यतिरिक्त  काेणतीही १ भाषा मूळ भारतीय भाषा व अन्य विदेशी भाषांपैकी एक भाषा विषय दाेनसाठी निवडावी लागेल. 
- गट एकमध्ये  १७ मूळ 
भारतीय भाषा आणि ९ अन्य विदेशी भाषा  अशा एकूण २६ विषयांचा समावेश असेल. 

‘त्या’ २६ भाषा कोणत्या? 
गट एकमधील मूळ १७ भारतीय भाषा : मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी, पाली, अर्धमागधी, महाराष्ट्री प्राकृत, अवेस्ता पहालवी. 
अन्य ९  विदेशी भाषा : इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, रशियन, जापनीज, स्पॅनिश, चायनीज, पर्शियन, अरेबिक.
 

Web Title: Now English is not compulsory in 10th, 12th; Any two Indian languages can be chosen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.