NEET Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! नीट परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर, असा करा चेक
By सायली शिर्के | Published: October 16, 2020 12:39 PM2020-10-16T12:39:53+5:302020-10-16T13:13:22+5:30
NEET Result 2020 : शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नीट परीक्षेच्या निकालाबाबत माहिती दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
नवी दिल्ली - नीट परीक्षेचा निकाल NEET Result 2020 आज (शुक्रवार, 16 ऑक्टोबर) जाहीर होणार आहे. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नीट परीक्षेच्या निकालाबाबत माहिती दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. देशभरात 13 सप्टेंबर रोजी जवळपास 3,843 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात 90 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जवळपास 15.97 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. लाखो विद्यार्थी निकालाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आज नीट 2020 चा निकाल आपल्या अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जाहीर करणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेचा निकाल (NEET Exam Result 2020) हा आज जाहीर केला जाऊ शकतो. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्यॉरिटी पिन आवश्यक आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए कॅटेगिरीनुसार कट ऑफ स्कोअर जाहीर केला जाणार आहे.
.@DG_NTA is announcing the results of #NEETUG 2020 today.
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) October 16, 2020
I wish all the best to the candidates. #NEETResult2020#NEETRESULTS
नीट परीक्षेचा निकाल असा चेक करा
- सर्वप्रथम नीटच्या ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
- नीट अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सिक्यॉरिटी पिन टाकून सबमिट करा.
- नीट 2020 चा निकाल आपल्या स्क्रीनवर दिसेल.
- रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.