मुक्त विद्यापीठ पदवी प्रथम, द्वितीय वर्ष परीक्षा वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 06:22 PM2021-08-06T18:22:38+5:302021-08-06T18:25:39+5:30

  लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या ऑनलाईन ...

Open University Degree First, Second Year Exam Schedule Changes | मुक्त विद्यापीठ पदवी प्रथम, द्वितीय वर्ष परीक्षा वेळापत्रकात बदल

मुक्त विद्यापीठ पदवी प्रथम, द्वितीय वर्ष परीक्षा वेळापत्रकात बदल

Next
ठळक मुद्देपहिल्या तुकडीतील अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या विभागीय केंद्रात ३ सप्टेंबरपासून तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड या दुसऱ्या तुकडीतील विभागीय केंद्राच्या अंतर्गत ४ सप्टेंबरपासून सुरू होतील.विद्यार्थ्यांना वेळापत्रकात उल्लेखलेल्या तारखेनुसार व आपल्या तुकडीनुसारच परीक्षा देता येईल.

 
लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून विद्यार्थी संख्या जास्त असल्याने तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी विभागीय केंद्रांच्या दोन तुकड्या (बॅचेस) तयार करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व परीक्षा नियंत्रक भटुप्रसाद पाटील यांनी दिली.
बी.ए. आणि बी.कॉम अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या ज्या विषयांच्या परीक्षा ११ ऑगस्टपासून सुरू होणार होत्या, त्या नव्या बदलाप्रमाणे पहिल्या तुकडीतील अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या विभागीय केंद्रात ३ सप्टेंबरपासून तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड या दुसऱ्या तुकडीतील विभागीय केंद्राच्या अंतर्गत ४ सप्टेंबरपासून सुरू होतील. बी.ए. आणि बी.कॉम शिक्षणक्रमाच्या द्वितिय वर्षाच्या परीक्षाच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले असून सर्व बदल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परीक्षेसाठी वेळापत्रक विद्यापीठ विभागकेंद्रानिहाय दोन तुकड्यांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून त्या विभागातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्या त्या बॅचनुसारच त्या विद्यार्थ्यांना परीक्षा उपलब्ध असेल. तुकडी क्रमांक १ अंतर्गत अमरावती विभागीय केंद्रातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद विभागीय केंद्र अंतर्गत औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, मुंबई विभागीय केंद्र अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर विभागीय केंद्रअंतर्गत नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्र व परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. तर तुकडी क्रमांक २ अंतर्गत : नाशिक विभागीय केंद्राच्या कक्षेत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे विभागीय केंद्राच्या कक्षेत पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर विभागीय केंद्राच्या कक्षेत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, तर नांदेड विभागीय केंद्राच्या कक्षेत नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्र व परीक्षा केंद्र यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना वेळापत्रकात उल्लेखलेल्या तारखेनुसार व आपल्या तुकडीनुसारच परीक्षा देता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांची तुकडी किती तारखेला आहे ते काळजीपूर्वक तपासून त्याच दिवशी त्या त्या विषयाची परीक्षा वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या वेळेमध्ये द्यावी. द्वितीय व तृतीय वर्ष बीए, बीकॉमच्या काही पेपरला विद्यार्थी संख्या अधिक असल्याने त्यांना सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान पेपर देता येऊ शकेल. काही पेपर्सना संख्या कमी असल्याने सकाळी ८ ते दुपारी १ किंवा दुपारी ३ ते रात्री ८ यावेळेत पेपर देता येणार आहे. तुकडीनिहाय द्वितीय वर्ष बी.ए. साठी पर्यावरणशास्त्र विषयाची परीक्षा पहिली व दुसरी तुकडी अनुक्रमे १२ आणि १३ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानंतर द्वितीय वर्षासाठी तुकडीनिहाय परीक्षा नसेल.

Web Title: Open University Degree First, Second Year Exam Schedule Changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.