HSC, SSC Board Exam Time Table: पालक, विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेच्या तयारीला लागा! दहावी बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

By सीमा महांगडे | Published: September 19, 2022 07:34 PM2022-09-19T19:34:19+5:302022-09-19T19:35:15+5:30

संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.

Parents, students get ready for the board exam! Probable time table for 10th ssc and 12th hsc has been announced | HSC, SSC Board Exam Time Table: पालक, विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेच्या तयारीला लागा! दहावी बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

HSC, SSC Board Exam Time Table: पालक, विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेच्या तयारीला लागा! दहावी बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

राज्य मंडळाने जाहीर केलेले सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि महाविद्यालयांना कळविण्यात येईल, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असेही राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

संभाव्य वेळापत्रक :
तपशील : लेखी परीक्षेचा कालावधी
बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३
दहावी : २ मार्च ते २५ मार्च

Web Title: Parents, students get ready for the board exam! Probable time table for 10th ssc and 12th hsc has been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.