भारतीय शिक्षण व्यवस्थेत आयआयटीचे पथदर्शक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 02:33 PM2022-03-02T14:33:14+5:302022-03-02T14:41:05+5:30

भारतात कायमच दर्जेदार शिक्षणाला चालना देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांमध्ये IIT नेहमीच अग्रणी असतात यात कोणतीही शंका नाही.

Pathbreaking Initiatives by indian institute of technologies in Indian Education System | भारतीय शिक्षण व्यवस्थेत आयआयटीचे पथदर्शक उपक्रम

भारतीय शिक्षण व्यवस्थेत आयआयटीचे पथदर्शक उपक्रम

Next

भारतात कायमच दर्जेदार शिक्षणाला चालना देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांमध्ये IIT नेहमीच अग्रणी असतात यात कोणतीही शंका नाही. संयुक्त उपक्रम असो किंवा वैयक्तिक आयआयटीनं कायमच सर्वांसाठी ओपन कोर्सेस सुरू करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयआयटी प्रवेश परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असल्यामुळे प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पर्यायी माध्यमे शोधली पाहिजेत असे भारत सरकार आणि IIT चे मत आहे.

सर्वांसाठी खुल्या असलेले विविध ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि आयआयटीनं कायमच सहकार्य केले आहे. २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी काही लोकप्रिय उपक्रम या लेखात नमूद करण्यात आलेत. उद्योन्मुख तंत्रज्ञानाच्या दिशेने शिक्षणातील हे उपक्रम कोणतीही खाजगी विद्यापीठे, महाविद्यालये/संस्था किंवा आयआयटीच्या विद्यार्थ्यांना पेड आणि अनपेड असे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येतात. हा लेख भारतातील आयआयटी द्वारे नवे उपक्रम सुरू करण्यावर विस्तारानं चर्चा करतो.

आयआयटी आणि त्यांचे उपक्रम
इंस्टिट्यूट ऑफ एमिनन्स, IIT दिल्ली ने IIT PAL आणि STEM मेंटॉरशिप प्रोग्राम सुरू करून ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याप्रकारे अन्य आयआयटीदेखील आहेत जे कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांसाठी स्वयं-NPTEL आणि जीआयएएन GIAN अभ्यासक्रमांद्वारे असंख्य ऑनलाइन अभ्यासक्रम ऑफर करतात. 

इनिशिएटिव्हकोणी सुरू केला?
IIT प्रोफेसर असिस्टेड लर्निंग (IIT PAL)आयआयटी दिल्ली 
जीआयएएन (GIAN)आयआयटी खडगपूर
व्हर्च्युअल लॅब्स (Virtual Labs)आयआयटी दिल्ली 
एसटीईएम मेंटोरशिप प्रोग्राम (STEM Mentorship Program)    आयआयटी दिल्ली 
स्वयं एनपीटीईएल (SWAYAM-NPTEL) आयआयटी आणि आयआयसी

                                                                      
IIT प्रोफेसर असिस्टेड लर्निंग (IIT PAL)

IIT दिल्लीने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण क्षेत्रात IIT PAL हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. IIT- प्रोफेसर असिस्टेड लर्निंग (PAL) प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापन IIT मधील प्राध्यापकांच्या टीमद्वारे केले जाते. विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावेत आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी IIT PAL लेक्चर्स मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्वयं प्रभा चॅनेल तसेच दूरदर्शन DTH चॅनल क्रमांक २२ वर प्रसारित केली जातात.

IIT PAL मध्ये आयआयटी प्राध्यापक आणि विषयातील तज्ज्ञांनी दिलेली व्याख्याने ही संबंधित विषयातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी असतात. बोर्ड किंवा राष्ट्रीय प्रवेश परीक्षांव्यतिरिक्त, IIT PAL मध्ये शिकवल्या जाणार्‍या विषयांसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जात नाहीत. याव्यतिरिक्त, IIT PAL मध्ये स्टडी मटेरिअल, लेक्चर्स, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे आणि थेट संवाद यांचाही समावेश करण्यात आला आहे. ११ वी आणि १२ वीचे  विद्यार्थी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसाठी नोंदणी करू शकतात.

जीआयएएन (GIAN) 
आयआयटी खरगपूरने २०१५ मध्ये पहिला ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अॅकॅडमिक नेटवर्क्स (GIAN) अभ्यासक्रम सुरू केला. उच्च शिक्षणातील ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अॅकॅडमिक नेटवर्क्स अभ्यासक्रमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक आणि उद्योजकांच्या टॅलेंट पूलचा वापर करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने मान्यता दिली आहे.

हे अभ्यासक्रम त्यांना सध्याची भारतीय शैक्षणिक संसाधने वाढवण्यासाठी, गुणवत्ता सुधारण्याच्या प्रक्रियेत तेजी आणण्यासाठी, तसंच भारताची वैज्ञानिक आणि त्रांत्रिक क्षमता वाढवण्यासाठी भारतात उच्च शिक्षण संस्थांशी संपर्क साधण्यास मदत करतात. 

GIAN द्वारे समर आणि विंटरमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रम ऑफर केले जातात. IIT Kharagpur कडून नियमितपणे सर्व वर्गांना उपस्थित राहिलेल्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येते.


व्हर्च्युअल लॅब्स (Virtual Labs)
नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटीच्या अंतर्गत, व्हर्च्युअल लॅब्स हा उपक्रम भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अन्य १२ संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे. यामध्ये आयआयटी दिल्ली समन्वय संस्था आहे. हा उपक्रम आयआयटी आधारित शिक्षणात एक प्रोटोटाईप बदल आहे. हा अशा प्रकारचा पहिला उपक्रम असल्याने, अंदाजे ७०० पेक्षा अधिक वेब-सक्षम प्रयोगांनी युक्त असलेल्या १०० पेक्षा जास्त आभासी प्रयोगशाळा रिमोट ऑपरेशन आणि व्ह्यूविंगसाठी डिझाइन केल्या गेल्या आहेत.

याशिवाय, खालील व्यक्ती उपक्रमांसाठी इच्छित लाभार्थी आहेत :

विज्ञान, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी तसंच प्राध्यापकांना चांगली प्रयोगशाळा उपकरणे आणि सुविधा उपलब्ध नाहीत.

हायस्कूलचे विद्यार्थी ज्यांना चालना मिळेल आणि त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळेल.

संशोधक जे विविध संस्थांमध्ये संसाधने संबद्ध आणि सामायिक करू शकतात.

अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये ज्यांना सामग्री आणि संबंधित शिक्षण संसाधनांचा फायदा होऊ शकतो.

एटीईएम मेंटोरशिप प्रोग्राम (STEM Mentorship Program)
आयआयटी दिल्लीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) मेंटॉरशिप प्रोग्राम सुरू केला आहे. हा प्रोग्राम विशेषत: ११ वीच्या विद्यार्थिनींसाठी तयार करण्यात आला आहे. याचा उद्देश त्यांना विज्ञान आणि नवकल्पनांबद्दल सर्जनशीलपणे विचार करण्यास प्रशिक्षित करणे हा आहे. STEM मेंटॉरशिप संशोधन समस्यांचे निराकरण करण्यात आणि ज्ञानाचा एक मजबूत पाया तयार करण्यात मदत करेल

या उपक्रमांतर्गत, प्रत्येक शालेय विद्यार्थिनीला त्यांच्या रिसर्च स्कॉलर्ससह आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक सदस्य मेंटोर म्हणून मार्गदर्शन करतील. दोन आठवड्यांच्या विंटर प्रोजेक्ट, ऑनलाइन लेक्चर सीरिज (रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि काही अभियांत्रिकी शाखांमधील मॉड्यूल्सचा समावेश असलेला) आणि समर प्रेजेक्टसह तीन स्तरीय कार्यक्रम आहे.  तसेच, एका बॅचमध्ये ११ वीच्या केवळ १० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

स्वयं-एनपीटीईएल (SWAYAM-NPTEL) 
IITs आणि IISc बंगळुरू, NPTEL यांच्या संयुक्त विद्यमाने २००३ मध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत यासाठी १७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसंच ८ लाखांहून अधिक प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. २०२२ पासून, NPTEL ने स्वयम द्वारे हिंदुस्तानी संगीत आणि बहु-विषय प्रवाहांवर सुमारे ५०० पेक्षा अधिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. काही सर्वात लोकप्रिय अभ्यासक्रमांमध्ये डेटा सायन्स (Data Science), इन्ट्रोडक्शन टू एमएल (Introduction to ML), प्रोग्रामिंग कोर्सेस इन पायथन (Programming courses in Python), जावा (Java), सी (C) इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच, हे अभ्यासक्रम पूर्णपणे विनामूल्य आहेत आणि कोणत्याही ठिकाणाहून विद्यार्थी याची नोंदणी करू शकतात.

Web Title: Pathbreaking Initiatives by indian institute of technologies in Indian Education System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.