पेट परीक्षेचा निकाल जाहीर

By सीमा महांगडे | Published: September 23, 2022 03:02 PM2022-09-23T15:02:30+5:302022-09-23T15:03:02+5:30

मुंबई विद्यापीठाने २६ आणि २७ ऑगस्ट २०२२ रोजी घेतलेल्या पेट (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला.

pet exam result declared | पेट परीक्षेचा निकाल जाहीर

पेट परीक्षेचा निकाल जाहीर

googlenewsNext

मुंबई: 

मुंबई विद्यापीठाने २६ आणि २७ ऑगस्ट २०२२ रोजी घेतलेल्या पेट (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाकडून घेतलेल्या पेट परीक्षेसाठी एकूण ४ हजार ७८५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ५९१ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेच्या निकालाची उत्तीर्णतेची टक्केवारी ५४.१४ टक्के एवढी आहे. चार विद्याशाखेतील विविध ७९ विषयासाठी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील २ हजार १०३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार १७१ विद्यार्थी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील ७८४ विद्यार्थ्यांपैकी ४६८ विद्यार्थी, मानव्यविद्याशाखेतील १ हजार २३५ विद्यार्थ्यांपैकी ५७१ विद्यार्थी आणि आंतरविद्याशाखेतील ६६३ विद्यार्थ्यांपैकी ३८१ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालामध्ये १ हजार १०९ विद्यार्थी तर १४८२ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

Web Title: pet exam result declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.