अखेर फार्मसी प्रवेशाला सुरुवात; २० जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी, सीईटीकडून वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 08:47 AM2023-07-13T08:47:55+5:302023-07-13T08:48:47+5:30

हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, डी. फार्म आणि सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या  प्रवेशासाठी अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली आहे.

Pharmacy admission finally begins; Opportunity to apply till 20th July, schedule announced by CET | अखेर फार्मसी प्रवेशाला सुरुवात; २० जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी, सीईटीकडून वेळापत्रक जाहीर

अखेर फार्मसी प्रवेशाला सुरुवात; २० जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी, सीईटीकडून वेळापत्रक जाहीर

googlenewsNext

मुंबई : सीईटीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असलेली औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रममधील चार वर्षांचा बी. फार्म. (बॅचलर ऑफ फार्मसी) आणि सहा वर्षांचा फार्म. डी. (डॉक्टर ऑफ फार्मसी) या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलने मंगळवारपासून सुरू केली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत २० जुलैपर्यंत आहे.

‘फार्मसी’ क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या विविध व्यवसायांना मागणी वाढल्याने आणि रोजगारांच्या विविध संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने पदविका आणि पदवी फार्मसी अभ्यासक्रमांना मागणी आहे. यंदाचे प्रवेश अद्याप सुरू झालेले नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा होती. अखेर सीईटी सेलने मंगळवारी प्रवेशाची अधिसूचना जारी करत प्रवेशफेरीसह वेळापत्रक जाहीर केले आहे.

यंदा २० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करता येणार आहे. २३ जुलैला संभाव्य गुणवत्ता यादी जाहीर होणार असून या यादीतील त्रूटीबाबत २६ जुलै अखेर तक्रार करण्याची मुदत आहे. २८ जुलैला  पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.  त्याच दिवशीही जागांचे तपशील जाहीर होणार आहेत. तर तीन प्रवेश फेरी होणार आहेत.  १४ ऑगस्टपासून वर्ग सुरू होणार आहेत.

डी. फार्म, हॉटेल मॅनेजमेंटच्या पदविका अर्ज करण्यास मुदतवाढ
हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, डी. फार्म आणि सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या  प्रवेशासाठी अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांना २४ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील. तंत्रशिक्षण संचालनालयाने १२ जूनपासून हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, डी. फार्म आणि सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्याची मुदत ३ जुलैला संपली. 

असे असेल प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज : २० जुलैपर्यंत
कागदपत्रांची पडताळणी : २० जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
पक्की गुणवत्ता यादी : २८ जुलै
पहिल्या कॅपसाठी पसंतीक्रम : २९ ते ३१ जुलै
पहिली प्रवेशाची यादी : २ ऑगस्ट
प्रवेश कन्फर्म करणे :३ ते ५ ऑगस्ट
(सविस्तर वेळापत्रक सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर )

Web Title: Pharmacy admission finally begins; Opportunity to apply till 20th July, schedule announced by CET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.