ऑनलाइन क्लाससाठी नव्हता फोन, तरीही परिस्थितीशी झगडत १०वीच्या परीक्षेत मिळवले ९८ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 04:03 PM2021-07-04T16:03:49+5:302021-07-04T16:06:30+5:30
Education News: एका अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याने सोईसुविधांचा अभाव असतानाही नेटाने अभ्यास करत १०वीच्या परीक्षेत तब्बल ९८.०६ टक्के गुण मिळवले आहेत. त्यासह त्याने संपूर्ण जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे.
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथील एका अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याने सोईसुविधांचा अभाव असतानाही नेटाने अभ्यास करत १०वीच्या परीक्षेत तब्बल ९८.०६ टक्के गुण मिळवले आहेत. त्यासह त्याने संपूर्ण जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. दहावीमध्ये ९८.०६ टक्के गुण मिळवणारा मनदीप सिंह हा गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे शाळेत जाऊ शकला नव्हता. तसेच ऑनलाइन क्लाससाठी त्याच्याकडे फोन किंवा संगणक नव्हता. मात्र संपूर्ण एकाग्रतेने केलेला अभ्यास आणि कुटुंबीय व पोलिसांनी केलेल्या मदतीच्या जोरावर त्याने केवळ चांगला अभ्यास केला नाही तर परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. (The phone was not for the online class, but still struggled with the situation and got 98 percent in the 10th exam)
मनदीप सिंह याने परीक्षेत अव्वल आल्यानंतर डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मनदीपचे वडील हे शेतकरी आहेत. मनदीपसुद्धा कधीकधी शेतात जाऊन काम करतो. तो म्हणाला की, मी अभ्यासाबरोबरच शेतात जाऊन काम करतो. तसेच घरकामामध्ये माझ्या आई-वडिलांची मदत करतो.
मनदीप सिंहवा त्याचा मोठ्या भावाकडून मदत मिळाली. त्याने जम्मू स्थित शेर ए काश्मीर कृषी विज्ञान आणि प्रौद्योगिकी विश्वविद्यालयामध्ये अभ्यास केला आहे. मात्र तो सुद्धा कोरोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे घरी परतला होता. आता NEET ची परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टरीचे शिक्षण घेण्याची इच्छा मनदीप याने व्यक्त केली आहे.
Surpassing ordeals, Mandeep Singh from J&K's Udhampur tops the district with 98.6% in State Board. "During the lockdown, my brother helped me in my studies. Despite inadequate power supply & other facilities in my village Amroh, I managed to study," he says pic.twitter.com/d44ncCYtos
— ANI (@ANI) July 4, 2021
मनदीप याने सांगितले की, सरकारने दुर्गम भागातील क्षेत्रात शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी खूप योजना आणल्या आहेत. गरीब विद्यार्थ्यांची सरकारने मदत केली पाहिजे. त्यांच्या स्वप्नांना साध्य करण्यामध्ये त्यांची मदत केली पाहिजे, असेही तो म्हणाला. दरम्यान, आपल्या मित्रांबाबत बोलताना त्याने सांगितले की, त्यांनी लॉकडाऊनबाबत त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत असल्याची तक्रार केली. मात्र मी समस्यांबाबत वारंवार तक्रार करण्याऐवजी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आणि कठोर मेहनत घेतली.
"After 10th, I want to clear NEET and become a doctor. I request the govt to keep supporting poor students and help them in achieving their dreams. Besides studies, I also work in the field and help my parents in household chores," adds Mandeep pic.twitter.com/bNCyqkIHg2
— ANI (@ANI) July 4, 2021