पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; २२ मेपासून प्रवेश प्रक्रिया; २६ जूनला पहिली यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:19 AM2024-05-22T09:19:19+5:302024-05-22T09:19:43+5:30

अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Post Graduate Admission Schedule Announced; Admission Process from May 22; First list on June 26 | पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; २२ मेपासून प्रवेश प्रक्रिया; २६ जूनला पहिली यादी

पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; २२ मेपासून प्रवेश प्रक्रिया; २६ जूनला पहिली यादी

मुंबई : मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, संलग्नित, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

ही सर्व ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. https://muadmission. samarth.edu.in/ या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर व्हिडीओ लिंक देण्यात आली आहे.

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
ऑनलाइन नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज सादर - २२ मे  ते १५ जून
कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी - २० जून (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)
तात्पुरती गुणवत्ता यादी - २१ जून (संध्याकाळी ६ वाजता)
तक्रार - २५ जून (दुपारी १ वाजेपर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी - २६ जून (संध्याकाळी ६ वाजता)
ऑनलाइन शुल्क भरणे - २७ जून ते १ जुलै ( संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)
द्वितीय गुणवत्ता यादी - २ जुलै (संध्याकाळी ६ वाजता)
ऑनलाइन शुल्क भरणे - ३ ते ५ जुलै (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)
कॉलेज सुरू - १ जुलै

Web Title: Post Graduate Admission Schedule Announced; Admission Process from May 22; First list on June 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.