भारतीय रेल्वेमध्ये 2409 पदांची भरती; सर्व पोस्टिंग महाराष्ट्रात, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 10:13 PM2023-08-29T22:13:19+5:302023-08-29T22:14:01+5:30

Railway Apprentice Recruitment 2023: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे.

Railway Recruitment 2023: Indian Railway Recruitment 2409 Posts; All postings in Maharashtra only | भारतीय रेल्वेमध्ये 2409 पदांची भरती; सर्व पोस्टिंग महाराष्ट्रात, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

भारतीय रेल्वेमध्ये 2409 पदांची भरती; सर्व पोस्टिंग महाराष्ट्रात, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

googlenewsNext

RRC CR Apprentice Recruitment 2023: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. मध्य रेल्वेत शिकाऊ उमेदवारांची हजारो पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत साइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, 28 सप्टेंबरपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील.

या भरतीद्वारे मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवाराच्या 2409 जागा भरल्या जातील. यातील 1649 पदे मुंबई क्लस्टरमध्ये, 152 पदे पुणे क्लस्टरमध्ये, 76 पदे सोलापूर क्लस्टरमध्ये, 418 पदे भुसावळ क्लस्टरमध्ये आणि 114 पदे नागपूर क्लस्टरमध्ये भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा त्याच्या समकक्ष किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्रही असायला हवे.

RRC CR शिकाऊ भरती 2023: वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे.

RRC CR शिकाऊ भर्ती 2023: निवड अशी असेल
या पदांसाठी उमेदवाराच्या निवडीसाठी गुणवत्ता यादी मॅट्रिकमधील गुणांची टक्केवारी (किमान 50% एकूण गुणांसह) + ITI ज्या ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारी करायची आहे, त्या आधारे तयार केली जाईल.

आरआरसी सीआर अप्रेंटिस भर्ती 2023: स्टायपेंड
या पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 7 हजार रुपयांपर्यंतचे मानधन दिले जाईल.

RRC CR शिकाऊ भर्ती 2023: अर्ज शुल्क इतके भरावे लागेल
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क 100 रुपये भरावे लागतील. उमेदवार डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/एसबीआय चलन इत्यादीद्वारे अर्ज फी भरू शकतो. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साइटचा संदर्भ घेऊ शकतात.

Web Title: Railway Recruitment 2023: Indian Railway Recruitment 2409 Posts; All postings in Maharashtra only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.