रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; 9144 पदांवर बंपर भरती, 8 एप्रिल शेवटची तारीख...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 08:16 PM2024-04-03T20:16:57+5:302024-04-03T20:17:26+5:30
तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे.
Indian Railway Recruitment 2024 : तुम्ही सरकारीनोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. केंद्र सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या रेल्वे विभागात बंपर भरती निघाली आहे. यासाठी दहावी पास असणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. आता फॉर्म भरण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर.
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने भारतीय रेल्वेमध्ये तंत्रज्ञ पदांसाठी 9,144 पदांची भरती काढली आहे. 9 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम तारीख 8 एप्रिल 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट https://indianrailways.gov.in/ वर अर्ज करू शकतात.
जाणून घ्या पदांची माहिती...
तंत्रज्ञ श्रेणी-1 एकूण 1,092 पदे
तंत्रज्ञ श्रेणी-3 एकूण 8,052 पदे
या भरतीमध्ये अहमदाबाद, अजमेर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, गोरखपूर, गुवाहाटी, जम्मू आणि श्रीनगर, कोलकाता, मुंबई, मुझफ्फरपूर, पटना, प्रयागराज, रांची, सिकंदराबाद, सिलीगुडी आणि तिरुवनंतपुरम या शहरांमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. 18 ते 36 वर्षे वयोगटातील उमेदवार टेक्निशियन ग्रेड-1 पदासाठी अर्ज करू शकतात, तर 18 ते 33 वर्षे वयोगटातील उमेदवार टेक्निशियन ग्रेड-III पदांसाठी अर्ज करू शकतात. एससी आणि एसटीला पाच वर्षांची तर ओबीसींना तीन वर्षांची सूट मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता-
टेक्नीशियन ग्रेड-I सिग्नल -बीएससी (फिझिक्स, इलेक्ट्रॉनिक्सष कॉप्यूटर सायन्स, आयटी किंवा इंस्ट्रियूमेंटेशन/ बीई-बीटेक / तीन वर्षीय इंजीनिअरिंग डिप्लोमा).
टेक्नीशियन ग्रेड-III -10वी पास आणिसंबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट. टेक्नीशियन ग्रेड-III (एस अँड टी) पदांसाठी 10वी , आयटीआय किंवा फिझिक्स, मॅथ्ससोबत 12वी पास.
फी किती-
अनारक्षित, मागास आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PH आणि सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी 250 रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे भरली जाऊ शकते.
वेतनश्रेणी-
तंत्रज्ञ ग्रेड 1 उमेदवारांना दरमहा 29,200 पगार रुपये मिळेल तर, तंत्रज्ञ श्रेणी 3 उमेदवारांना दरमहा 19900 रुपये पगार मिळेल.