भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांची मेगाभरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 02:46 PM2024-08-29T14:46:12+5:302024-08-29T14:47:46+5:30
RRB JE Recruitment 2024 : सरकारी नोकरी, खासकरुन रेल्वेतील नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
RRB JE Recruitment 2024 : सरकारी नोकरीची, खासकरुन रेल्वेतीलनोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांची मेगाभरती जाहीर झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे, अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही अद्याप अर्ज केलेला नसेल, तर रात्रीपर्यंत 11.59 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. या भरती प्रक्रेयेत ज्युनिअर इंजीनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट पदे भरली जाणार आहेत.
30 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती, तर आज(29 ऑगस्ट) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही आज रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज भरू शकता. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. फी भरल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फेरबदलासाठी 30 ऑगस्ट 2024 ते 9 सप्टेंबर 2024 पर्यंत करेक्शन विंडो खुली असेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार RRB rrbapply.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज भरू शकता.
रिक्त जागा किती आहेत?
रेल्वेने 7951 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यापैकी 17 पदे केमिकल सुपरवायजर/ रिसर्च अँड मेटालर्जिकल सुपरवायजर/ रिसर्चचे आहेत. पण, ही पदे फक्त गोरखपूरसाठी असतील. उर्वरित 7934 पदांमध्ये कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंटसह केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक यांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
वेगवेगळ्या पदांची पात्रता वेगळी आहे, ज्याची तपशीलवार माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. 1 जानेवारी 2025 रोजी वयाची 18 ते 33 वर्षे पूर्ण करणारे सर्व उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
फी किती आहे
फी भरणे केवळ ऑनलाइन मोडद्वारे केले जाऊ शकते. एससी, एसटी, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक, माजी सैनिक आणि ईबीसी प्रवर्गातून येणाऱ्यांना 250/- रुपये शुल्क भरावे लागेल. इतर सर्व प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल.
निवड प्रक्रिया
ही परीक्षा संगणकावर आधारित असेल, जी दोन टप्प्यांत घेतली जाईल. दोन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. परीक्षा होईपर्यंत नियमितपणे अधिकृत वेबसाइट तपासत रहावे.