शाळेच्या बसेसला पिवळा रंग देण्यामागे 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 07:10 PM2020-01-10T19:10:38+5:302020-01-10T19:12:06+5:30
शाळेच्या बसेसला अनेकदा पिवळा रंग दिल्याचे आपण पाहताे, परंतु हा पिवळा रंग का दिला जाताे माहितीये का ?
शाळेच्या बसेसला नेहमी पिवळा रंग दिलेला आपल्याला पाहायला मिळताे. परंतु कधी प्रश्न पडला आहे का की या बसेसला पिवळाच रंग का दिला जाताे ?, तर या मागील एक महत्त्वाचे कारण आहे. ज्यामुळे पिवळा रंग या बसेसला देणे याेग्य ठरते.
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील सर्वच बसेसला पिवळा रंग देणे बंधनकारक आहे. हा नियम भारतातच नाही तर जगातील अनेक देशांममध्ये आहे. परंतु यामागे एक कारण आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की लाल रंग लवकर नजरेत भरताे. त्यामुळे लाल रंगाचा सिग्नल लांबूनही आपल्या नजरेस पडताे. परंतु एका संशाेधनानुसार असे समाेर आले आहे की लाल रंगाच्या तुलनेत पिवळा रंग 1. 24 पट जास्त नजरेस भरताे. अंधारात पिवळा रंग सर्वप्रधम आपल्याला दिसताे. तसेच धुके असताना देखील पिवळा रंग त्यातून आपल्याला दिसताे. त्यामुळेच अनेकदा धुक्याच्या वेळेस पिवळ्या रंगाचा सिग्नल सुरु असल्याचे दिसते. त्याचबराेबर शहरांमधील स्ट्रीट लाईट सुद्धा पिवळ्या रंगाच्या असतात. या रंगामुळे अधिक प्रकाश पडताे.
त्यामुळे शाळांच्या बसेसला पिवळा रंग दिलेला असताे. ज्यामुळे एखादी दुर्घटना टाळता येऊ शकते. या रंगाबराेबरच अनेक नियम या बसेससाठी तयार करण्यात आले आहेत. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून हे नियम तयार करण्यात आले आहेत.