जॉर्जियाच्या वैद्यकीय शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा; भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी जागतिक मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2024 08:52 PM2024-09-24T20:52:59+5:302024-09-24T20:55:23+5:30
जॉर्जियामध्ये जारी केलेले सर्व एमडी डिप्लोमा जगभरात मान्यताप्राप्त असतील.
दिल्ली: भारतातील जॉर्जियन दूतावासाने वैद्यकीय शिक्षण प्रणालीसंबंधी जॉर्जियाच्या शिक्षण, विज्ञान आणि युवक मंत्रालयाने केलेल्या अलीकडील सुधारणांबद्दल भारतीय विद्यार्थ्यांना अधिकृतपणे सूचित केले आहे. जारी केलेल्या नोटीसनुसार, "वैद्यकीय सरावासाठीच्या जॉर्जियन कायद्याच्या कलम 14 नुसार, MD प्रोग्रामचे पदवीधर (भारतातील MBBS समतुल्य), कनिष्ठ डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे, डॉक्टरांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी अधिकृत असतील.
जॉर्जियामधील शाळा/विद्यापीठांमधील वैद्यकीय कार्यक्रम (MD) हे नॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल क्वालिटी एन्हान्समेंट द्वारे मान्यताप्राप्त/अधिकृत आहेत, ज्याला जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघ (WFME) द्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील मान्यताप्राप्त झाली आहे. ही आंतरराष्ट्रीय मान्यता हे सुनिश्चित करते की, जॉर्जियामध्ये जारी केलेले सर्व एमडी डिप्लोमा जगभरात मान्यताप्राप्त असतील.
ही पात्रता भारतातील एमबीबीएस पात्रतेशी पूर्णपणे समतुल्य आहे. शिवाय प्रमाणित डॉक्टर उपलब्ध नसल्यास, कनिष्ठ डॉक्टर स्वतंत्रपणे आपत्कालीन वैद्यकीय सेवा देखील देऊ शकतात. दरम्यान, जॉर्जियामधील विद्यार्थ्याला नोंदणी आणि सरावासाठी परवाना मिळतो. वरील सर्व गोष्टी स्पष्टपणे दर्शवतात की जॉर्जियामधील वैद्यकीय शिक्षण NMC च्या नवीन नियमांचे पालन करत आहे
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.