रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 7951 पदांवर होणार मेगाभरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 05:03 PM2024-07-22T17:03:48+5:302024-07-22T17:04:34+5:30
रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
RRB JE Notification 2024 :रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये कनिष्ठ अभियंता(RRB JE Notification 2024) पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानुसार, कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट, केमिकल पर्यवेक्षक (संशोधन) आणि वैद्यकीय पर्यवेक्षक (संशोधन) या पदांच्या एकूण 7951 जागा भरल्या जाणार आहेत.
30 जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
भारतीय रेल्वेमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार 30 जुलैपासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित RRB झोनच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीचे तपशील काळजीपूर्वक वाचावे.
RRB JE पदासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सर्व महिला उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पहिला टप्पा पार करणाऱ्या उमेदवारांना त्यांची फी परत केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठीची लिंक लवकरच उपलब्ध करण्यात येईल. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर जावे.