आरटीईची वेबसाईट स्लो झाल्याने पालकांना मनस्ताप; शेवटचे तीन दिवस शिल्लक
By शीतलकुमार कांबळे | Published: March 14, 2023 04:41 PM2023-03-14T16:41:17+5:302023-03-14T16:41:49+5:30
मुदत वाढवून देण्याची मागणी . आर. टी. ई 25 टक्केचे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत आहेत.
सोलापूर : मोफत शिक्षणाचा अधिकार आर टी इ अंतर्गत सध्या शासनातर्फे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहे. मात्र, शासनाची वेबसाईट ही स्लो असल्यामुळे अनेक पालकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे शासनाने आरटीईचा अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.
आर. टी. ई 25 टक्केचे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन वेबसाईट स्लो होऊ शकते. याचा विचार करत पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, असा संदेश वेबसाईट दर्शविण्यात आला आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कागदपत्रांची ही माहिती प्राथमिक संचालनालयाकडून देण्यात आली आहे. निवासी पुराव्यात ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यातील एक पुरावा ग्राह्य धरता येईल.
याशिवाय जन्मतारखेचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असल्याचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा, अनाथ बालकांची आवश्यक प्रमाणपत्रे, विधवा/ घटस्फोटित महिला असल्याचा पुरावा अशी विविध कागदपत्रे ही प्रवेशाच्या
वेळी पालकांना सादर करावी लागणार आहेत.