SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 04:27 PM2024-10-14T16:27:14+5:302024-10-14T16:28:41+5:30
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी संधी.
SBI Recruitment : सरकारीनोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. तुम्ही बँकेत सरकारीनोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी कोणत्याही परिस्थितीत गमावू नका. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विविध पदांसाठी भरती काढली आहे. विशेष म्हणजे, यासाठी अर्ज करण्याचा आज(14 ऑक्टोबर 2024) शेवटचा दिवस आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, यामध्ये 25.75 लाख रुपयापर्यंतचा पगार मिळेल.
स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) भर्ती 2024 साठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पात्र आणि सक्षम उमेदवारांनी ही संधी गमावू नये. अधिक माहितीसाठी बँकेच्या sbi.co.in/web/careers/ या करिअर पोर्टलवर जाऊन संपूर्ण तपशील तपासू शकता.
किती पदे आहेत?
SBI SCO भरती मोहिमेद्वारे 1,497 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर होती, नंतर तारीख वाढवण्यात आली.
SBI SCO भर्ती 2024: रिक्त जागा तपशील
डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) - प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी MMGS-II: 187 पदे
डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) – इन्फ्रा सपोर्ट आणि क्लाउड ऑपरेशन: 412 पदे
डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) – नेटवर्किंग ऑपरेशन: 80 पदे
डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) – आयटी आर्किटेक्ट: 27 पदे
डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) – इंफॉर्मेशन सिक्युरिटी: 7 पदे
असिस्टेंट मॅनेजर (सिस्टम): 784 पदे
असिस्टेंट मॅनेजर (सिस्टम) बॅकलॉग व्हॅकन्सी: 14 पदे
पगार किती मिळेल?
डेप्युटी मॅनेजर पदांसाठी वार्षिक CTC अंदाजे ₹25.75 लाख प्रतिवर्ष असेल, तर असिस्टंट मॅनेजर पदांसाठी वार्षिक CTC ₹18.67 लाख प्रतिवर्ष असेल. बँकेने म्हटले आहे की, उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो. उमेदवाराने अनेक अर्ज सबमिट केल्यास फक्त शेवटचा वैध आणि पूर्ण अर्ज विचारात घेतला जाईल.
फी किती लागेल?
सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी SBI SCO अर्ज शुल्क ₹750 आहे. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्यासाठी क्लिक करा
SBI SCO भर्ती 2024: अर्ज कसा करावा
सर्वप्रथम बँकेच्या करिअर पोर्टल sbi.co.in/web/careers वर जा.
त्यानंतर Join SBI वर क्लिक करा आणि नंतर Current Opening पर्यायावर क्लिक करा.
आता जाहिरातीवर क्लिक करा आणि नंतर Apply Online लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर विनंती केलेली माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
आता तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि अर्ज भरा.
यानंतर कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.
शेवटी तुमचा फॉर्म सबमिट करा.